Aries To Pisces Horoscope Today in Marathi : ५ एप्रिल २०२५ रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी शनिवारी संध्याकाळी ७ वाजून २७ मिनिटांपर्यंत राहील. पुनर्वसु नक्षत्र रविवारी पहाटे ५ वाजून ३२ मिनिटांपर्यंत राहील. आज अतिगंड योग १० वाजून २ मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच राहू काळ ९ ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच ५ एप्रिल हा चैत्र नवरात्रीचा आठवा दिवस आहे. हा दिवस महाष्टमी किंवा दुर्गाष्टमी म्हणून साजरा केला जातो. चैत्र नवरात्री दरम्यान दुर्गाष्टमीचा दिवस विशेष महत्त्वाचा असतो. या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. या वर्षी दुर्गाष्टमी शनिवारी ५ एप्रिलला आहे. दुर्गा अष्टमीची पूजा घरात सुख, शांती आणि प्रेम देऊन जाते. दुर्गाष्टमीला तुमच्या राशीचा दिवस कसा जाणार हे आपण जाणून घेऊया…
५ एप्रिल पंचांग व राशिभविष्य (Mesh To Meen Horoscope) :
मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)
कामातील बदल समजून घ्या. कामाचा व्याप वाढता राहील. मनावर फार ताण घेऊ नका. मानपमानाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. आवडीच्या पदार्थांसाठी आग्रही राहाल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)
घराची दुरूस्ती काढाल. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. काही नवीन संधी चालून येतील. तरुण वर्गाशी मैत्री कराल. प्रापंचिक सौख्य उत्तम राहील.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)
मित्रा मंडळींचा गोतावळा जमवाल. विश्वासू लोकांकडेच मन मोकळे करावे. व्यावसायिक अडचणी दूर कराव्यात. सामाजिक कामाकडे ओढ वाढेल. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)
घरात धार्मिक कार्यक्रम निघतील. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. कामाच्या ठिकाणी आपली आब राखून राहाल. पथ्य पाण्याकडे लक्ष द्यावे. मानसिक सौख्य जपावे.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today)
कामाच्या ठिकाणी व्याप वाढता राहील. योग्य वेळी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. व्यसनांपासून लांब राहावे. मित्रांची मदत वेळेवर मिळेल. जोडीदाराकडून अपेक्षा वाढेल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)
कोर्टाची कामे लांबणीवर पडतील. घरच्या मंडळींचे सौख्य वाढेल. वादाचे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या सुशिक्षितपणाचे कौतुक कराल. मनातील गैरसमज काढून टाकावेत.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)
एकमेकांच्या बाजू विचारात घ्याव्यात. आर्थिक व्यवहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा. राहत्या घराचे प्रश्न उभे राहतील. मुलांच्या अडचणी समजून घ्याव्यात . घाई घाईने कोणतेही काम करू नका.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today)
तब्येतीत सुधारणा दिसून येईल. दगदग वाढली तरी फळ चांगले मिळेल. मैत्रीत गैरसमज संभवतात. चांगल्या संगतीत राहावे. जवळचा प्रवास काळजीपूर्वक करा.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today)
कामात इतरांची मदत घ्यावी लागेल. इतरांच्या सल्ल्याने नवीन योजना आखाल. घरच्या दुरूस्तीचे काम निघू शकते. मनावर काहीसे दडपण राहील. कामातून समाधान शोधावे.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)
जोखमीचे व्यवहार सावधतेने करा. प्रेम प्रकरणात जवळीक वाढेल. मुलांच्या समस्या सोडवाव्या लागतील. सहकार्यांकडून कौतुक केले जाईल. नवीन आर्थिक योजना आखाल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)
उष्णतेचे विकार संभवतात. कामाचा आलेख वाढता राहील. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. आपल्या बुद्धीचा कस लागू शकतो. वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)
सामाजिक कामातून ओळखी वाढतील. स्थावरचे व्यवहार जमून येतील. मित्राची वेळेवर मदत मिळेल. मनावरील ताण कमी करण्याचं प्रयत्न करा. जवळच्या व्यक्तीशी मनमोकळ्या गप्पा होतील.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर