Shani Mangal Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ एका ठराविक काळानंतर राशिबदल करतो. मंगळाच्या राशिबदलामुळे १२ राशींच्या लोकांच्या आयुष्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रभाव पडत असतो. नऊ ग्रहांमध्ये मंगळ हा खूप खास ग्रह मानला जातो. मंगळ पुरुष स्वभावाचा ग्रह आहे आणि त्याचप्रमाणे तो गतिमान व आज्ञाधारकही आहे. त्याला भूमिपुत्र व युद्धदेवता, असे म्हटले जाते. दसऱ्यानंतर मंगळ ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे आणि कर्क राशीत येताच मंगळावर शनीची वक्रदृष्टी पडणार आहे. अशा स्थितीत षडाष्टक नावाचा योग तयार होईल. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींना फायदा; तर काही राशींनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. षडाष्टक योग तयार झाल्यामुळे कोणत्या राशींना अडचणी येऊ शकतात ते जाणून घेऊ.

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा मंगळ आणि शनि एकमेकांपासून सहाव्या व आठव्या घरात असतात तेव्हा षडाष्टक योग तयार होतो. २० ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३.०४ वाजता मंगळ कर्क राशीत प्रवेश करील.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
Shukra Budh Labh Yog
चार दिवसानंतर अचानक पलटणार या ३ राशींचे नशीब, शुक्र-बुधच्या लाभ दृष्टीचा दुर्मिळ योग
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
Shani Mahadasha
शनिच्या महादशामध्ये ‘या’ चार राशींना मिळणार अपार धनलाभ अन् पैसा, नोकरी-व्यवसायात चमकणार नशीब
Horoscope 2025 Malavya rajyog in meen shukra gochar
Malavya Rajyog 2025 : नवीन वर्षात ‘या’ राशींची होणार आर्थिक भरभराट! मालव्य राजयोगामुळे बनाल अमाप संपत्तीचे मालक अन् घराचे स्वप्न होईल पूर्ण

Dasara 2024 Wishes : दसऱ्यानिमित्त नातेवाईक प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर खास मराठीतून पाठवा शुभेच्छा अन् कार्ड्स; पाहा लिस्ट

मेष ( Aries Horoscope )

षडाष्टक योग मेष राशीच्या लोकांसाठी काही समस्या निर्माण करू शकतो. घरामध्ये काही मुद्द्यांवरून वाद होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या रागाकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे. करिअरमध्येही अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य न मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास, अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होईल. तुम्हाला पैसे वाचविण्यासाठी एक योजना बनवावी लागेल. व्यवसायाबद्दल बोलल्यास, अनेक ऑर्डर, संधी हातून निसटू शकतात. अशाने आर्थिक नुकसान होऊ शकते. तुमच्या जोडीदाराशी काही मुद्द्यांवरून मतभेद होऊ शकतात. आरोग्याची विशेष काळजी घ्या.

सिंह (Leo Horoscope )

मंगळचा कर्क राशीत प्रवेश झाल्यानंतर शनीच्या वक्रदृष्टीमुळे सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल. अशा परिस्थितीत तुम्ही मित्र किंवा कुटुंबासह धार्मिक प्रवासाला जाऊ शकता; मात्र अनावश्यक खर्च टाळा. अशा परिस्थितीत प्री-प्लॅन बनवा. करिअरमध्येही खूप ताण येऊ शकतो. तुम्ही जोमाने नवीन नोकरी शोधू शकता. तुमचे व्यावसायिक भागीदाराशी काही मुद्द्यांवर मतभेद होऊ शकतात. अशा परिस्थितीत तुमच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता आहे. जीवनात आनंदाचे क्षण फार कमी येतील. कोणत्या ना कोणत्या मार्गाने अडथळे येत राहतील. आरोग्याबाबत थोडे सावध राहा. अशा परिस्थितीत खर्च जास्त असू शकतो.

Story img Loader