31st March 2024 Easter Sunday Horoscope: ३१ मार्च २०२४ ला ईस्टर संडे साजरा केला जाणार आहे. आजचा दिवस वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा शुभ मानला जात आहे. आज फाल्गुन कृष्ण पक्षातील षष्ठी व सप्तमी तिथी एकत्र जुळून आली आहे. आज ज्येष्ठा नक्षत्र जागृत असणार आहे. आजच्या या दिवशी मेष ते मीन पैकी कोणत्या राशींना लाभदायक कालावधी अनुभवता येईल व कुणाला कष्ट उचलावे लागतील हे जाणून घेऊया.

३१ मार्च २०२४, पंचांग, राशी भविष्य

मेष:-वाहन जपून चालवावे. डोके शांत ठेवून काम करावे. गरज पडल्यास चार पाऊले मागे यावे. लबाड लोकांपासून दूर राहावे. जोडीदाराचा आधार सुखावणारा असेल.

Ratha Saptami 2025
Ratha Saptami 2025: रथ सप्तमीला सूर्याला प्रसन्न करण्यासाठी कशी करावी पूजा? जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्व
happy ratha saptami wishes
Ratha Saptami Wishes : आज रथ सप्तमीनिमित्त प्रियजनांना…
Gemini Horoscope today
Gemini Horoscope Today : अचानक धनलाभाचा योग अन् नोकरी- व्यवसायात यश, मिथुन राशींच्या लोकांना कसा जाईल आजचा दिवस, वाचा
Daily Horoscope 4 February 2025
Daily Horoscope : रथ सप्तमीला सूर्यदेव धरणार ‘या’ राशींवर कृपेचे छत्र; कोणाला नोकरी, व्यवसायात फायदा तर कोणाला मिळेल कौटुंबिक सुख
Guru Margi 2025
Guru Margi 2025 : २४ तासानंतर पालटणार ‘या’ तीन राशींच्या लोकांचे नशीब; गुरुच्या सरळ चालीने संपत्तीत वाढ, नोकरी-व्यवसायात यश
mahakumbh 2025
आज महाकुंभमेळ्यातील शेवटचे अमृत स्नान! बुधादित्य योगामुळे ‘या’ ३ राशींचा होईल भाग्योदय, करिअर -व्यवसायात मिळेल भरपूर यश
shani gochar positive impact
आता नुसता पैसा! शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार नवी नोकरी, वैवाहिक सुख अन् गडगंज श्रीमंती
How will today be for Leo people
Leo Horoscope Today : आजच्या दिवशी सिंह राशीच्या व्यक्तींना होणार धनलाभ अन् मिळेल प्रत्येक कामात यश; जाणून घ्या कसा जाईल संपूर्ण दिवस
3rd February 2025 Rashi Bhavishya In Marathi
३ फेब्रुवारी राशिभविष्य: व्यापारात होईल फायदा, मैत्रीची लाभेल साथ; वाचा १२ राशींच्या आठवड्याची कशी होणार सुरुवात?

वृषभ:-व्यापारात चांगली प्रगती करता येईल. राहत्या घराचे प्रश्न मार्गी लागतील. सत्संग सारख्या गोष्टीत मन रमेल. पित्ताचा त्रास वाढू शकतो. शक्यतो संघर्षाचे वातावरण टाळावे.

मिथुन:-जवळच्या मित्रांच्या गाठी पडतील. आरोग्याकडे वेळीच लक्ष द्यावे. औद्योगिक चढउतार जाणवतील. पैसे गुंतवताना काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी आपली पत सांभाळावी.

कर्क:-भागीदारावर फार अवलंबून राहू नका. जोडीदाराच्या कलाने घ्यावे लागेल. लहान-सहान गोष्टीचा विपर्यास करू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. चित्त स्थिर ठेवावे लागेल.

सिंह:-व्यावसायिक वातावरणाचा अंदाज घ्यावा. छुप्या शत्रूंचा त्रास जाणवेल. मोठी उडी घेतांना विचार करावा. आवक-जावक याचा योग्य अंदाज घ्यावा. वरिष्ठ तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

कन्या:-शेजार्‍यांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. स्वत:कडे दुर्लक्ष करू नये. मुलांना स्वच्छतेचे वळण लावावे. अति धाडस करू नये. प्रवासात क्षुल्लक अडचण येऊ शकते.

तूळ:-दिवस आनंदात जाईल. मन व बुद्धी यांचा समतोल राखावा. स्थावरचे काही प्रश्न उदभवू शकतात. घरगुती गैरसमज दूर करावेत. मुलांशी मतभेद होतील.

वृश्चिक:-हातापायाला किरकोळ इजा संभवते. कामातील क्षुल्लक चुका टाळाव्यात. धोरणीपणाने वागावे लागेल. उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत. सकारात्मक विचार करावेत.

धनू:-कौटुंबिक कामाची दगदग वाढेल. संभाषणाची आवड पूर्ण कराल. काही कामे खिळून पडतील. छोट्या कारणांवरून गैरसमज करून घ्याल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मकर:-कामाचा व्याप वाढता राहील. व्यावसायिक उलाढाल वाढेल. प्रवासाची जोखीम शक्यतो घेऊ नये. चिकाटी सोडू नका. स्थावरची कामे मार्गी लागतील.

कुंभ:-नातेवाईकांचा त्रास संभवतो. घरात शोभेच्या वस्तु आणाल. गायन कलेचे कौतुक केले जाईल. आध्यात्मिक बळ वाढेल. वारसाहक्काची कामे मार्गी लागतील.

मीन:-स्वत:च्या मतावर आग्रही राहाल. स्वभावातील हेकेखोरपणा वाढू शकतो. प्रवासाचा आनंद घ्याल. मनावरील दडपण बाजूला सारावे. तुमच्या बोलण्याला धार येईल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader