Daily Prediction For Zodiac Signs : आज २० मार्च २०२५ रोजी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील षष्टी तिथी आहे. षष्टी तिथी दुपारी २ वाजून ४६ मिनिटांपर्यंत राहील. वज्र योग संध्याकाळी ६ वाजून २० मिनिटांपर्यंत जुळून येणार आहे. तसेच अनुराधा नक्षत्र रात्री ११ वाजून ३२ मिनिटांपर्यत जागृत असणार आहे. आज राहू काळ १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज फाल्गुन वद्य षष्ठीला संत एकनाथ समाधीस्त झाले. म्हणूनच फाल्गुन महिन्याच्या वद्य षष्ठीला ‘एकनाथ षष्ठी’ असे संबोधले जाते. तर आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार हे जाणून घेऊया…
२० मार्च पंचांग व राशिभविष्य (Today’s Horoscope For Zodiac Signs)
मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)
कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. खाण्या-पिण्याची हौस भागवाल. मनाजोगा आर्थिक लाभ होईल. गायन कलेत प्रगती होईल. घरासाठी काही वस्तु खरेदी कराल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)
आवडत्या कामात गुंग व्हाल. दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. महिलांची नटण्या-मुरडण्याची हौस पूर्ण होईल. सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. चैनीत दिवस घालवाल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)
मानसिक चंचलतेला आवर घालावी. ज्येष्ठांची मनापासून सेवा कराल. एखादी चांगली संधी चालून येईल. दानधर्म करण्याचा योग येईल. तीर्थ यात्रेसाठी नाव नोंदवाल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)
तुमची समाजप्रियता वाढेल. मित्रपरिवारात वाढ होईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. कामात स्त्रियांची चांगली मदत मिळेल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today)
कामात वडीलांचे सहकार्य मिळेल. कामात स्थिरता ठेवावी. व्यावसायिक लाभाने खुश व्हाल. कामाच्या ठिकाणी विश्वास संपादन कराल. काही चांगल्या गोष्टी अनुभवास येतील.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)
धार्मिक कामात प्रगती कराल. योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. काही चांगल्या संधी चालून येतील. मुलांच्या व्रात्यपणाकडे लक्ष द्यावे. तुमच्यातील सुसंस्कृतपणा दिसून येईल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)
अचानक धनलाभ होईल. काही गोष्टी सहज घडून येतील. दिवस काहीसा आळसात घालवाल. फार हुरळून जाऊ नका.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today)
उत्तम वैवाहिक सौख्य राहील. दिवस मौज-मजेत जाईल. भागिदारीतून चांगला नफा मिळेल. तुमच्या संपर्क कक्षा रुंदावतील. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today)
कामात काही क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. कामगारांचे सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. दिवस समाधानात जाईल. आरोग्यात सुधारणा होईल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)
बुद्धीचा सदुपयोग कराल. शैक्षणिक कामे सुरळीत पार पडतील. प्रेमसौख्याला बहर येईल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)
शांत झोपेचा अनुभव घ्याल. घराची छान सजावट कराल. घरगुती वातावरण आनंदी राहील. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. दिवस सुख-शांतीत जाईल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)
प्रवासाची आवड पूर्ण कराल. वैचारिक दृष्टीकोन सुधारेल. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. उत्तम साहित्य वाचनात येईल. भावंडांचे प्रेमळ सौख्य लाभेल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर