उल्हास गुप्ते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Personality As Per Birthdate: व्यक्तीची जन्मकुंडली समजून घेण्यासाठी जन्मतारीख व वेळ विचारात घेणे आवश्यक असते. याच जन्मतारखेवरून व्यक्तीचा भाग्यांक सुद्धा शोधता येतो. भाग्यांक हा मुळात विविध अंकातून तयार होत असतो. भाग्यांकानुसार आपल्या स्वभावाचे तसेच भविष्याचेही वेध घेता येतात. भाग्यांक व मूलांकाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा व्यक्तीच्या मानसिकतेला स्पर्श केला जातो. मूलांक- भाग्यांक या दोन्हीच्या आधारे तुमची शारीरिक क्षमता स्वभावातील गुणदोष विचार करण्याची पद्धती, नोकरी उद्योगधंद्यातील चढउतार, वैवाहिक जीवन या बाबतीत माहिती उपलब्ध होऊ शकते. तसेच पूर्ण जन्मतारखेतील कुठल्याही एका अंकाची उपस्थिती जास्त असेल तर अंकाचे चांगले वाईट परिणाम समजू शकतात. यानुसार आज आपण भाग्यांक एक असलेल्या मंडळींही स्वभाव वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत.

तुमचा भाग्यांक कसा ओळखायचा?

भाग्यांक काढतांना प्रथम संपूर्ण जन्मतारीख मांडावी

जन्मदिवस- ०६

जन्ममहिना- ०६

जन्मवर्ष १९९९= १+९+९ + ९ = २८= १०

म्हणजे ६+६+१०= २२= २ + २ = ४ हा तुमचा भाग्यांक ठरतो . यानुसार ज्यांचा भाग्यांक (१) असेल त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया…

भाग्यांक १ चा स्वभाव

भाग्यांक एक असलेल्या व्यक्ती अतिशय न्यायबुद्धीने वागणाऱ्या असतात आणि आपल्या अधिकाराचा वापरही उत्तम तऱ्हेने करतात.

स्वभाव अतिशय मनमोकळा, स्वतंत्र विचारसरणी त्यामुळे राजकीय सामाजिक क्षेत्रात यांना खूप मानाचे स्थान लाभते.

जर या एक भाग्यांकाचा मूलांकही एक असेल तर अशा व्यक्ती उद्योगधंद्यात नोकरीत खूप उत्तम तऱ्हेने प्रगती साधतात, मात्र यांच्या मध्ये कोणी हस्तक्षेप केलेला यांना बिलकूल आवडत नाही.

जर यांच्या जन्मतारखेला मूलांक चार असेल तर त्यांच्या लहरी स्वभावानुसार यांचे कामाचे प्रयोजन असते तर कधी यांच्या प्रेमप्रकरणात भावुकतेचा अतिरेक होत असतो.

जर यांचा मूलांक नऊ असेल तर अशा व्यक्ती वागण्या बोलण्यात अतिशय गंभीरतेने वागतात. अतिशय शिस्तप्रिय असतात. आयुष्यात येणाऱ्या विपरित प्रसंगात विचलित होत नाहीत. त्वरित स्वत:ला सावरतात.

हे ही वाचा<< गजलक्ष्मी राजयोग बनल्याने ‘या’ राशींच्या नशिबात अपार धन- संपत्ती? पेढ्यांसारखा गोड होणार तुमचा ऑगस्ट महिना

एकूण या भाग्यांक एकला खूप मित्रपरिवार लागतो. आयुष्यात येणाऱ्या संधीचे ते सोने करतात. अतिशय मेहनत घेणे, कामाचा आशय पूर्ण समजून घेणे ,योग्य तो निर्णय घेणे. मूळात स्वतंत्र वृत्ती प्रबळ इच्छा शक्ती यातून या व्यक्ती सहज यशाकडे झेप घेतात.

या लेखाच्या पुढील टप्प्यात आपण भाग्यांक २ ते ९ विषयी सुद्धा जाणून घेणार आहोत. यासाठी लोकसत्तावरील राशीवृत्त या कॅटेगरीला भेट द्यायला विसरू नका.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emotional in love zodiac signs who are too moody what is your lucky number as per birthdate personality kundali astrology svs
Show comments