Guru Gochar Vipreet Rajyoga 2023: तब्बल १२ वर्षांनी २२ एप्रिल रोजी गुरू ग्रहाचा प्रवेश मेष राशीत झाला आहे. गुरू हा आकाश तत्त्वाचा एकमेव ग्रह आहे. आकाश तत्त्व हे प्रसरण पावत असते, विस्तारित होत असते. गुरूचा संबंध ज्या राशी ग्रहाशी व स्थानाशी येतो त्या त्या संबंधी येणाऱ्या गोष्टींना तो विस्तारित असतो. मेष ही मंगळाची राशी नि मंगळ हा गुरूचा मित्र ग्रह त्यामुळे नकळत मंगळाच्या भूमिकेचाही प्रवेश मेष राशीत होतो. याच गुरु गोचरसह मे महिन्यात विपरीत राजयोग तयार होत आहे. १२ वर्षांनी पहिल्यांदाच गुरु गोचरने विपरीत राजयोग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार हा राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. याचा प्रभाव तब्बल ५ राशींवर अत्यंत शुभ स्वरूपात दिसून येणार आहे. या राशी कोणत्या व त्यांना कसा लाभ होणार हे पाहूया…

विपरीत राजयोग बनल्याने या राशी होणार करोडपती?

मिथुन रास (Gemini Zodiac)

देवगुरु बृहस्पतिने मेष राशीत गोचर केल्याने मिथुन राशीच्या लोकांना प्रचंड लाभ होण्याची चिन्हे आहेत. सध्या स्वराशीत मंगळ पण जेव्हा तो कर्क राशीत येईल तेव्हा संयमाने बोलण्याने आपण स्वत:चे हित साधू शकाल. खूप वेळा समाजात मित्रवर्गात ताठर भूमिका घेऊन वागू नका. स्थावर जमिनीचे व्यवहार करताना कागदपत्रे तपासून घ्यावीत. घरातील काही महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नका. सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान गुरू वक्री होत आहे. या काळात मोठ्या आर्थिक उलाढाली करू नका. आरोग्याची काळजी घ्या. नवमातला शनी प्रवासाचे योग देईल. त्यातून तो आध्यात्मिक आनंद देईल. सामाजिक क्षेत्रात, राजकारणात २८ नोव्हेंबरनंतर आपल्या अपेक्षा पुऱ्या होतील.

Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
Dev Diwali 2024
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : शुक्र करणार धनु राशीमध्ये प्रवेश, ‘या’ तीन राशींना मिळणार पैसाच पैसा, मिळेल प्रत्येक कामात यश

तूळ रास (Libra Zodiac)

या वर्षी २२ एप्रिल रोजी गुरूचा मेष राशीत प्रवेश झाला आहे. या मेष राशीत आधीपासूनच राहू आणि हर्षल आहेत. आता राहू आणि गुरू एकत्र आले आहेत. त्यातूनच हा चांडाळ योग तयार होत आहे. आपल्या तूळ राशीच्या सप्तमस्थानात मेष रास आहे आणि हा चांडाळ योगही सप्तम स्थानात, त्यामुळे उद्योगधंदा, भागीदारी, कौटुंबिक सौख्य या सर्वांसाठी सामंजस्य आणावे लागेल. माणुसकी, भूतदया या गोष्टी प्रत्यक्षांत आचरणात आणताना आपल्या बुद्धीची घालमेल होईल. पण पंचमातील कुंभेचा शनी व षष्ठातील गुरूसादृश नेपच्यून आपल्याला आधार देणारे ठरतील.

कर्क रास (Cancer Zodiac)

गुरु गोचर कर्क राशीसाठी शुभ वार्ता घेऊन आले आहे. आपल्याला नशिबाची साथ मिळूशकते . करिअरमध्ये प्रगती झाल्याने व्यक्तिमत्वात सुद्धा सुधारणा कराव्या लागतील. दशमातील गुरू आनंदी, सांसारिक सुख भोगणारा उच्च मनोवृत्तीचा असेल. विशेष म्हणजे मेष राशीतील गुरू राजकारण, सामाजिक क्षेत्रात उद्योगधंद्यात आपले कर्तृत्व उत्तमरीतीने दाखवून देतो पण या वेळी गुरूसह राहूचे सान्निध्य काहीसे विपरीत गोष्टी घडवून आणण्याकडे असेल

कन्या रास (Virgo Zodiac)

अष्टमात हर्षल-गुरू-राहू त्यामुळे स्वभावातील एकसूत्रता हरवल्यासारखी जाणवेल. कन्या ही बुधाची बौद्धिक राशी पण या ग्रहाच्या फेऱ्यात आपले अस्तित्व हरवल्यासारखे होते. उद्योगधंद्यात, नोकरीत, भागीदारीत, हळवेपणा आणि भावनिक गुंतवणूक वाढेल. त्यातून महत्त्वाचे निर्णय घेणे कठीण होईल. पण अशा वेळी षष्ठातील शनी या विरोधी विचारांना थांबवील. हे आलेले छोटे वादळ वळवाच्या पावसासारखे हवेत विरून जाईल. अष्टमात गुरू असल्याने, कौटुंबिक सुखात लहानसहान गैरसमज, नातेवाईकांचे रुसणे यावर शांत राहणे हा एकमेव रामबाण उपाय ठरेल. गुरूचे नवमस्थानातील आगमन खूपच आनंददायी ठरेल.

हे ही वाचा<< ६० दिवसांनी उद्या लक्ष्मी नारायण राजयोग बनल्याने ‘या’ राशी होणार अपार श्रीमंत? ‘या’ मार्गे होऊ शकता करोडपती

मीन रास (Pisces Zodiac)

बारा राशीतील अखेरची जलरास मीन. या राशीचा स्वामी गुरू. ही रास व्ययस्थानात येते. अतिशय शांत, कोमल, उत्तम, दयाभाव, सहानुभूती, आत्मीयता साऱ्या खऱ्या माणुसकीच्या खुणा या राशीत प्रामुख्याने दिसून येतील. मीन राशीच्या पत्रिकेत गुरू जितका सुरक्षित असेल तितकी ती व्यक्ती कनवाळू, कृपाळू, पापभीरू आणि क्षमाशील असते. सहसा जास्त व्याजाच्या आमिषाने पैसे उसने देणे टाळावे. या गुरू-राहूसह वेगाने फळे देणारा हर्षल आहे. तेव्हा बँकेच्या झटपट व्यवहारात काळजी घ्यावी. स्वराशीत नेपच्यून अध्यात्माला खूपच पोषक ठरेल पण अध्यात्मात वैचारिक बैठक असू द्या. त्यात भोळेभाबडेपणा येऊ देऊ नका. त्यातून आपला गैरफायदा घेतला जाईल. बाकी धनस्थानातला राहू मीन राशीत येईल तेव्हा गुरुबलात खूप चांगला फरक दिसून येईल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)