Monsoon Rain Astrology Predictions: दिनांक २२ मार्च २०२३ पासून आपले नवे शोभन हे संवत्सर सुरू झाले आहे. दिनांक २२ जून 2023 रोजी रवीने आर्द्रा नक्षत्रात प्रवेश केला आणि यानंतरची सलग दहा नक्षत्रे ही पावसाची असतात. पृथ्वीच्या जवळच्या महत्वाच्या ग्रहांचे अग्नि राशीतील भ्रमणामुळे यंदाचा उन्हाळा हा प्रचंड होता. मेदिनीय ज्योतिषात वाऱ्याचे प्रतिनिधित्व बुध हा ग्रह करतो. त्यामुळे पावसाचे भविष्य वर्तवताना रवि, चंद्राच्या खालोखालच या ग्रहाला ही महत्त्व द्यावे लागते. या अगोदरच म्हणजे दिनांक १७ जून ला हर्षलने कृतिका ह्या राक्षसगणी नक्षत्रात प्रवेश केलेला आहे. रवीने आर्द्रा नक्षत्र केला आणि त्याच दिवशी म्हणजे २२ लाच बुधाचा अस्त सुरू झाला. पुन्हा बुधाचा उदय १९ जुलै रोजी होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिनांक २४ ला बुधाचा मिथुन राशीत प्रवेश झालेलाआहे. दिनांक ३० जून २०२३ ला मंगळ सिंह राशीत प्रवेश करेल. २२ जून रोजी वृश्चिक लग्नावर रवीचा आर्द्रा नक्षत्रात प्रवेश झालेला होता. त्या वेळेच्या कुंडलीत ‘चंद्र-मंगळ’ युतीयोग, ‘शुक्र-हर्षल’ केंद्रयोग, ‘राहू- प्लुटोचा’ केंद्रयोग असे मुख्य ग्रहमान होते. या नक्षत्राचा वाहन मेंढा असल्याने या नक्षत्रावरचा पाऊस बराच लहरी असा राहणार आहे जिथे पडेल, तिथे चांगलाच होईल. बुधाचा अस्त असल्याने हा पाऊस खूपच अनियमित असा राहणार आहेत. या नक्षत्राच्या वरती जो काही पर्जन्य संभवतो त्याच्या संभाव्य तारखा पुढील प्रमाणे. दिनांक २४, २५, २९, ३० जून आणि १, २, ३ जुलै अशा आहेत.

दिनांक ६ जुलैला रवी हा पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करतो. यावेळी वृश्चिक लग्न उदित आहे. या नक्षत्राचे वाहन गाढव असल्याने या नक्षत्राचा पाऊस हा सर्वसाधारण होईल त्या वेळच्या कुंडलीत अनेक कुयोगांचा भरणा झालेला आहे. ‘चंद्र-हर्षल’ केंद्रयोग, ‘मंगळ-नेपच्यून’ अशुभ योग, वायु राशितील ‘रवी-बुध’ युती, ‘शुक्र नेपच्यून’ नवपंचम योग असे हे योग आहेत. या नक्षत्राच्या उत्तरार्धात पाऊस अनियमित आणि लहरी असा राहणार आहे. महाराष्ट्रातील काही भागात हा पाऊस पडेल. या नक्षत्रातील पर्जन्याच्या संभाव्य तारखा पुढीलप्रमाणे आहेत. ६, ७,८, 17 आणि १८ जुलै अशा आहेत. पाऊस हा चांगलीच ओढ देणारा असून, लहरी आणि अनियमितता अशी आर्द्रा आणि पुनर्वसु नक्षत्रांची अशी वैशिष्ट्ये सांगता येतील. पाऊस पडेल त्या ठिकाणी खूपच पडेल आणि काही ठिकाणी मात्र पुस खूपच कमी होईल.

भारतातील जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात म्हणजे पहाडी प्रदेशात मात्र या दोन नक्षत्रात जास्तीचा पाऊस होणार नाही. दिनांक २० जुलैला सायंकाळी रवी हा पुष्य नक्षत्रात प्रवेश करतो. यावेळी नक्षत्र प्रवेश लग्न कुंडलीत होणारे ग्रहयोग पुढील प्रमाणे आहेत. ‘राहू- प्लुटो’ केंद्रयोग, ‘शनी-मंगळ’ प्रतियोग, ‘चंद्र-हर्षल’ केंद्रयोग, अग्नि राशीत ग्रहाधिक्य असूनही, या नक्षत्राचे वाहन बेडूक असल्याने पाऊस दणकून, लहरी आणि वेडावाकडा सापडणार आहे. महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या प्रदेशात, मुंबई व कोकण सह विदर्भात हा पाऊस बुध शुक्र युती योगाच्या साह्याने दणकून पडेल व मोठी पडझड या पावसामुळे होऊ शकते. कृतिका नक्षत्रातील हर्षल मुळे हा पाऊस जोरदार होईल आणि वाहनांचे खूप मोठे अपघात याच कालखंडात घडलेले दिसून येणार आहेत. या पर्जन्याच्या संभाव्य तारखा २०, २२, २३ , २६, २७, २९, ३१ जुलै व १, २ ऑगस्ट अशा आहेत. हा पाऊस वादळी स्वरूपाचा असल्याने अनेक ठिकाणी नुकसानीचे योग आहेत.

दिनांक ६ जुलैला गोचर शुक्र सिंह राशीत प्रवेश करतो. तो लगेचचवक्री होऊन पुन्हा कर्क राशीत येईल. यामुळेच या पावसाळ्यातील सर्वात महत्त्वाची नक्षत्र पुष्य आणि आश्लेषा हीच राहणार आहेत.दिनांक 3 ऑगस्ट 2023 रवी आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करतो. यावेळी रवी नक्षत्र प्रवेश वृश्चिक लग्नावर होत आहे. ह्या कुंडलीतील प्रमुख ग्रहयोग पुढील प्रमाणे प्रभाव टाकणारे आहेत. ‘चंद्र-शुक्र’ प्रतियोग, हयात शुक्र वक्री आहे आणि त्याचा अस्तही आहे. ‘रवी-गुरु’ केंद्रयोग आहे. या नक्षत्राचेवाहन म्हैस असल्याने या नक्षत्राचा पाऊस खंडित स्वरूपाचा होणार आहे. मुंबई, कोकण, सह कोल्हापूर, सांगली या भागात हा पाऊस चांगला पडेल.

हे ही वाचा<< “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नोव्हेंबरनंतर स्वतंत्र…” ज्योतिषतज्ज्ञ सांगतात, “सत्तासंघर्ष टोकाला जाऊन नवे नाव…”

हा पाऊस अत्यंत लहरी व अनियमित येणार असून अनेक ठिकाणी हा पाऊस अनपेक्षित येईल. ‘राहू-प्लूटो’ केंद्रयोगामुळे अनेक नव्या ठिकाणी हा पाऊस पडेल. तर हा पाऊस जिथे नक्की पडेल असे वाटते, तेथे मात्र पडणार नाही आणि या पावसाच्या संभाव्य तारखा पुढीलप्रमाणे आहेत ३, ४, ६, ८, ११, १३, १६ ऑगस्ट अशा आहेत.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extreme rain on these dates in next four months as per graha nakshtra mangal aadra jyotish experts predicts monsoon astrology svs
Show comments