Kotipati Rajyog Chandika Yog and Jaya Yog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर राशी व नक्षत्र परिवर्तन करतात. यामुळे काही वेळा ग्रह एकमेकांच्या गोचर कक्षेत एकमेकांसमोर येतात आणि यातूनच कुंडलीत अनेक प्रकारचे राजयोग तयार होत असताात. आज आपण तब्बल ७ राशींसाठी लाभदायक सिद्ध होणाऱ्या तीन अत्यंत महत्त्वाच्या राजयोगांविषयी जाणून घेणार आहोत. वैदिक ज्योतिषशास्त्रात जया, चंडिका व कोटीपती राजयोगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे राजयोग कसे तयार होतात व त्याचा नेमका कोणत्या राशीला कसा लाभ होणार आहे हे जाणून घेऊया..
कोटीपती राजयोग (Kotipati Rajyog)
शुक्र आणि गुरु यांच्या युतीमुळे कोटीपती योग तयार होत असतो. या राजयोगामुळे लक्ष्मी मातेचा मोठा आशीर्वाद लाभत असल्याचे मानले जाते. ज्यांच्या कुंडलीत हा राजयोग तयार होतो त्यांना गडगंज श्रीमंती लाभू शकते असेही म्हटले जाते. जेव्हा कुंडलीत शुक्र आणि गुरु मध्यभागी असतात आणि शनि मध्यभागी तेव्हा कोटीपती योग जुळून येतो. या योगामुळे तुम्हाला करिअरमध्ये प्रचंड लाभ होण्याची शक्यता असते तसेच पगार वाढून तुमच्यावर लक्ष्मी मातेचा सदैव आशीर्वाद राहतो असेही मानले जाते. या योगामुळे प्रभावित व्यक्तींवर बुद्धिदाता गणपतीचा सुद्धा वरदहस्त असतो. सध्या शनी, शुक्र व गुरुची स्थिती पाहता कुंभ, मीन, मेष या राशी कोटीपती राजयोगाचे लाभ अनुभवू शकता.
जया योग (Jaya Rajyog)
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील सहाव्या घराचा स्वामी दुर्बल आणि दहाव्या घराचा स्वामी अत्यंत श्रेष्ठ असतो तेव्हा हा जया योग जुळून येतो. या योगामुळे प्रभावित राशींना शत्रूंना मात देण्यास बळ मिळते. हे शत्रू केवळ व्यक्तिरूपात नव्हे तर आळस, भाव- भावना यांच्या रूपात सुद्धा असू शकतात. धन्वंतरीच्या आशीर्वादाने या राशी आरोग्याच्या चिंतांपासून मुक्त राहू शकतात. आरोग्यम धनसंपदा या नियमाने जया योगाने प्रभावित राशीच्या मंडळींना सुद्धा एकाअर्थी समृद्ध होण्याची संधी असते. ग्रहस्थितीनुसार सध्या वृषभ, सिंह, कर्क राशी जया योगाचा लाभ अनुभवू शकतात.
हे ही वाचा<< २०२४ पर्यंत ‘महाधन राजयोग’ ‘या’ राशींना बनवणार लखपती? अमाप पैसा व गडगंज श्रीमंती तुमच्या कुंडलीत आहे का?
चंडिका योग (Chandika Rajyog)
ज्या राशीच्या कुंडलीत 6 व्या घराचा स्वामी आणि सूर्य यांची युती होते तेव्हा चंडिका योग तयार होतो. या योगामुळे प्रभावित व्यक्ती या खूप दयाळू व दानशूर असतात. यांना मानसिक सुख अत्यंत प्रिय असते त्यामुळेच इतरांना मदत करून, चिंता वाढवणाऱ्या संभाषणांपासून दूर राहून ते आयुष्य सुखाने जगण्याला प्राधान्य देतात. सध्या बुध व सूर्याची युती होणार असल्याने वृषभ, वृश्चिक या राशींना चंडिका राजयोगाचा लाभ होऊ शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)