Falgun Purnima 2024: फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा ही विशेष मानली जाते. सोमवारी २५ मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमा आहे. पौर्णिमा ही लक्ष्मी मातेची आवडती तिथी. अशातच फाल्गुनी पौर्णिमेला आपण होलिका दहन करतो. अशी धार्मिक श्रद्धा आहे की, फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीची पूजा केल्यानं तिचा आशीर्वाद मिळतो. यामुळे संपत्ती, समृद्धी, धनात वाढ होते,  यावेळी फाल्गुन पौर्णिमेला चार राशींच्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा राहू शकते. अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ राशींना होणार धनलाभ?

मेष राशी

फाल्गुन पौर्णिमा मेष राशीसाठी फायदेशीर ठरु शकते. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे.

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठीही फाल्गुन पौर्णिमा शुभ ठरु शकते. तुमचे उत्पन्नाचं नवीन स्रोत उघडू शकतात. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर काही दिवसांत तुम्हाला एखाद्या चांगल्या पॅकेजसह इतर कंपनीकडून कॉल येण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात.

(हे ही वाचा : ३ एप्रिलपर्यंत ‘या’ ५ राशींना होणार बक्कळ धनलाभ? बुधदेवाच्या कृपेने मिळू शकते प्रचंड पैसे कमविण्याची संधी )

वृश्चिक राशी

फाल्गुन पौर्णिमा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरु शकते. मालमत्तेबाबत न्यायालयात खटला सुरू असेल, तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. या काळात बेरोजगारांना नवीन नोकरी मिळू शकते. 

धनु राशी

धनु राशीच्या लोकांसाठी फाल्गुन पौर्णिमा सकारात्मक परिणाम घेऊन येणारी ठरु शकते. कामानिमित्त परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Falgun purnima 2024 maa laxmi krupa these zodiac sing can get huge money pdb