3rd January Marathi Horoscope: आज ३ जानेवारी २०२४ ला पौष कृष्ण पक्षातील उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात शोभन योग जुळून आला आहे. अशातच तुमच्या राशीला आजचा दिवस कसा जाणार हे पाहूया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष:- धीराने व शांततेने सर्व गोष्टी घ्याव्यात. आंधळा विश्वास ठेऊ नका. कुटुंबासाठी काही विशेष गोष्टी कराल. आवडीच्या पदार्थांवर ताव माराल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.

वृषभ:- दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. आवडत्या गोष्टी करायला मिळाल्याने आपण खुश असाल. सर्वांना प्रेमाने जिंकून घ्याल. प्रेमातील लोकांनी सबुरीने घ्यावे. मैत्रित मतभेद आड आणू नका.

मिथुन:- वैचारिक स्थैर्य बाळगा. काही गोष्टी कृतीतून दाखवून द्या. कलात्मक गोष्टीत आनंद वाटेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. बदल समजून घेऊन कामात हात घाला.

कर्क:- भावंडांना मदत कराल. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. वरिष्ठांना नाराज करू नका. घरातील ज्येष्ठ मंडळींचे विचार विरोधी वाटू शकतात. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस.

सिंह:- कामानिमित्त प्रवास घडेल. हातातील अधिकारचे बळ दाखवा. हातापायला किरकोळ इजा संभवते. लहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. विरोधक माघार घेतील.

कन्या:- आहाराची पथ्ये पाळावीत. चटकन प्रतिक्रिया दर्शवू नका. वादाचे प्रसंग टाळावेत. आत्मविश्वास कमी पडू देऊ नये. आवडी-निवडी कडे अधिक लक्ष द्याल.

तूळ:- अचानक धनलाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवू शकतो. संयमाने कामे करावी लागतील. कौटुंबिक स्थिती सलोख्याने हाताळावी. व्यावसायिक योजनावर विचार कराल.

वृश्चिक:- काही गोष्टी मनाविरुद्ध वाटू शकतात. वरिष्ठांच्या मतानेच चालावे. झोपेची तक्रार जाणवेल. काही कामे बौद्धिक कस पाहू शकतात. मैत्रीच्या बाबतीत साशंकता जाणवेल.

धनू:- हातातील संधी सोडू नका. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. नातेवाईकांना मदत कराल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या स्वरूपाचा नीट अंदाज घ्यावा.

मकर:- मनातील साशंकता दूर करावी. धार्मिक गोष्टीत मन रमेल. प्रामाणिकपणे कार्यरत राहाल. प्रवास करताना सावधगिरी बाळगावी. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.

कुंभ:- घरगुती वातावरण उत्तम राहील. कौटुंबिक कामात आनंद मानाल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. घाईने निर्णय घेऊ नयेत. तिखट शब्दांचा वापर टाळावा.

हे ही वाचा<< २०२४ या वर्षावर शनीचा अंमल! ‘या’ नेत्यांना बसणार मोठा दणका, ज्योतिषतज्ज्ञांची महत्त्वाची भविष्यवाणी

मीन:- सर्व बाजूंचा नीट विचार करून वागावे. आततायीपणा करू नका. चटकन कोणत्याही निर्णयावर येऊ नका. अडचणीतील लोकांना मदत कराल. धैर्य व संयम आवश्यक.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Falguni nakshatra shobhan yog 3rd january marathi horoscope of mesh to meen rashi bhavishya avoid these mistakes as per zodiac svs