Krishna Janmashtami 2022 : हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमीचे व्रत मोठ्या थाटामाटात साजरे केले जाते. या दिवशी भक्त कृष्णाची पूजा केली जाते आणि त्यांच्यासाठी उपवास ठेवला जातो. असे मानले जाते की, या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने संतती सुख मिळते, जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगती होते आणि वैवाहिक जीवन आनंदाने भरते. यावेळी जन्माष्टमीच्या दिवशी एक विशेष योग तयार होत आहे, ज्यामुळे या काही राशीच्या लोकांना भरपूर पैसा आणि यश मिळण्याची अपेक्षा आहे. या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
यावेळी जन्माष्टमीसाठी दोन दिवसांचा योग येत असल्याने यंदा हा उत्सव दोन दिवस साजरा होणार आहे. यावेळी जन्माष्टमी तिथीच्या दोन दिवशी म्हणजेच १८ आणि १९ ऑगस्ट रोजी येत आहे. यावेळी या सणासोबतच वृद्धी योगसारखा खास योग आणि मुहूर्त तयार होत आहे जो पूजेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा आहे.
वृद्धी योग : १७ ऑगस्ट दुपारनंतर ते १८ ऑगस्ट रात्री ८ वाजून ४१ मिनिटे
अभिजीत मुहूर्त : १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजून ५ मिनिटे ते १९ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजून ५६ मिनिटे
ध्रुव योग : १८ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजून ४१ मिनिटे ते १९ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजून ५९ मिनिटे
पुढील १४५ दिवसांसाठी शनिदेव राहणार मकर राशीमध्ये; ‘या’ राशींच्या नशिबाचे दार उघडणार
ज्योतिष शास्त्रानुसार ज्यांच्या कुंडलीत चंद्र कमजोर आहे त्यांच्यासाठी श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत वरदानापेक्षा कमी नाही. तसेच यावेळी वृद्धी योगामुळे ज्या जोडप्यांना मूल होत नाही त्यांच्यासाठी हे व्रत खूप शुभ राहील, असं ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे. कोणत्या राशीच्या लोकांना जन्माष्टमी व्रताचे विशेष लाभ होणार आहेत, हे आपण जाणून घेऊया.
- कर्क :
कर्क राशीचा ग्रह चंद्र आहे. जन्माष्टमी व्रताने चंद्र बलवान होतो. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. सर्व कामात यश मिळेल. आणि प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना फायदा होईल. तसेच, जर तुमच्यावर काही कर्ज असेल तर तुम्ही लवकरच त्यातून मुक्त व्हाल.
- वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांना भगवान श्रीकृष्ण खूप आशीर्वाद देतील. या राशीच्या लोकांना पैसा मिळण्याची शक्यता आहे. या लोकांची नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळेल.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)