Tirgrahi Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका विशिष्ट कालावधीत गोचर करुन त्रिग्रही योग आणि राजयोग तयार करतात. ज्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. अशातच आता १७ नोव्हेंबरला त्रिग्रही योग तयार होणार आहे. या दिवशी सूर्यदेव वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत तर मंगळ आणि बुध आधीच वृश्चिक राशीत जाणार आहेत. त्यामुळे त्रिग्रही योग तयार होईल. या योगाचा सर्व राशींवर प्रभाव दिसून येणार आहे. परंतु ३ अशा राशी आहेत ज्यांना या काळात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो तसेच त्यांचे नशीबही पालटू शकते. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

तूळ रास (Tula Zodiac)

अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Aries To Pisces Horoscope Today in Marathi
२६ डिसेंबर पंचांग: शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी १२ पैकी ‘या’ राशींना लक्ष्मीकृपेने मिळेल मेहनतीचे फळ; तुमच्या कुंडलीत धन की कष्ट?

त्रिग्रही योग तूळ राशीसाठी अनुकूल ठरू शकतो. कारण तुमच्या राशीच्या धन स्थानी हा योग तयार होणार आहे. त्यामुळे, या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तसेच, या काळात तुमची आर्थिक स्थितीही खूप चांगली राहू शकते. ज्यामुळे तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतात. तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदलही होऊ शकतात. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल, ज्यामुळे लोक तुमच्यावर प्रभावित होऊ शकतात. तसेच तुमचे करिअर मार्केटिंग, मीडिया, शिक्षक किंवा कम्युनिकेशनशी संबंधित असेल, तर हा काळ तुमच्यासाठी चांगला ठरु शकतो.

सिंह रास (Leo Zodiac)

सिंह राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योगाची निर्मिती शुभ ठरू शकते. कारण हा योग तुमच्या राशीतून चौथ्या स्थानी तयार होणार आहे. त्यामुळे या काळात वाहन व मालमत्तेचे सुख मिळू शकते. सुख-समृद्धीतही वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. मालमत्तेशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम सिद्ध होऊ शकतो. तसेच, तुमचे आईसोबतचे नाते अधिक चांगले होण्याची शक्यता आहे. त्रिग्रही योगाची दृष्टी कर्माच्या स्थानी असल्यामुळे नोकरदारांचे प्रमोशन होऊ शकते.

हेही वाचा- शुक्राचा मूळ त्रिकोण राशी तूळमध्ये प्रवेश होताच ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरू? २०२४ मध्ये भरमसाठ पैसा मिळण्याची शक्यता

मकर रास (Makar Zodiac)

त्रिग्रही योगाची निर्मिती मकर राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण तुमच्या गोचर कुंडलीत उत्पन्न आणि लाभाच्या स्थानी हा योग तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ ठरु शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader