Shanidev: पंचांगानुसार शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनिदेवाची उपासना केल्याने शनिदोष, साडेसती आणि धैय्या इत्यादींचे अशुभ प्रभाव बऱ्याच अंशी कमी होऊ शकतात. तर दुसरीकडे शनिदेवाच्या पूजेचा विशेष फायदा आहे. श्रावण महिन्यात शनिदेवाची पूजा केल्याने शनिदोषाचा प्रभाव बऱ्याच अंशी कमी होतो. श्रावण महिन्यातल्या शनिवारी काही राशींवर शनिदेवाची कृपा अधिक असते. शनिदेवाच्या आशीर्वादाने बिघडलेली कामे सुरळीत सुरू होतात. ३० जुलै रोजी हिंदूपरंपरेनुसार श्रावणचा पहिला शनिवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार श्रावणच्या पहिल्या शनिवारी अशा तीन राशी आहेत ज्यांचे भाग्य खूप चांगले असणार आहे. त्यांच्यावर शनिदेवाची विशेष कृपा असणार आहे. तर जाणून घ्या या तीन राशींबद्दल.
या राशींवर शनिदेवाची विशेष कृपा राहील
तूळ
तूळ राशीमध्ये शनि उच्च आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांच्या जीवनावर शुभ प्रभाव पडेल. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. यासोबतच जे लोक अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांचे कामही श्रावण शनिवारपर्यंत पूर्ण होऊ शकते. या राशीचे लोक आत्मविश्वासाने भरलेले असतील, ज्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल.
( हे ही वाचा: ऑगस्ट महिना ‘या’ चार राशींसाठी असणार लकी; करिअरमध्ये मिळेल नवीन संधी)
मकर
मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे. अशा परिस्थितीत शनिदेवाच्या कृपेने या राशींसाठी श्रावण शनिवार शुभ असणार आहे. या राशीच्या लोकांच्या मेहनतीला यश मिळेल. व्यवसायासोबतच नोकरीतही लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. ते ज्या कामात हात घालतील त्या कामात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. कामाच्या ठिकाणी या लोकांना कौतुकाची थाप मिळेल. तसंच एखादे रखडलेलं काम या शनिवारी पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कुंभ
या राशीचा स्वामी शनिदेव आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा राहील. समाजात मान-सन्मान मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासोबतच तुमची मानसिक आणि शारीरिक तणावातून सुटका होईल. नोकरी किंवा व्यवसायात मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करत असाल, तर यावेळी नोकरीच्या पदात पदोन्नती होईल. अनेक दिवसांपासून रखडलेलं काम यावेळी पूर्ण होऊन भरभराट होण्याची शक्यता आहे.
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)