Favourite Zodiac Signs of Lord Ganesha : सध्या गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना बाप्पा खूप आवडतो. गणेशोत्सवात हा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येतो. पण, तुम्हाला गणपतीच्या तीन प्रिय राशी माहिती आहेत का? बाप्पाला सर्वच राशी आवडतात, पण तीन राशी अति प्रिय आहेत. त्या राशींच्या लोकांवर नेहमी गणेशाची कृपा असते. आज आपण त्यांच्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
मेष
मेष राशीच्या व्यक्तींवर बाप्पाची नेहमी कृपा असते. या राशीचा स्वामी ग्रह हा मंगळ आहे. या राशीचे लोक धैर्यवान, बुद्धिमान आणि हुशार असतात. गणरायाच्या आशीर्वादामुळे हे लोक प्रत्येक क्षेत्रात नाव कमवतात आणि आयुष्यात भरपूर धन, संपत्ती आणि यश मिळवतात.
हेही वाचा : Personality Traits : कसा असतो ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव? वाचा, ज्योतिषशास्त्र काय सांगते…
मिथुन
मिथुन राशी बाप्पाच्या प्रिय राशींपैकी एक आहे. या राशीचा स्वामी ग्रह बुध असतो; त्यामुळे या राशीवर नेहमी बाप्पाची कृपा असते. गणपतीच्या आशीर्वादामुळे या राशीच्या व्यक्तींना समाजात मान सन्मान मिळतो. घरात धनधान्यांची कमतरता भासत नाही. त्यांनी केलेल्या मेहनतीचे त्यांना नेहमी फळ मिळते.
मकर
मकर राशीचे लोक खूप मेहनती आणि स्वभावाने खूप दयाळू असतात. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींवर गणपतीची नेहमी कृपा असते. बाप्पाच्या आशीर्वादामुळे ते प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात आणि कोणत्याही अडचणींचा खंबीरपणे न घाबरता सामना करतात.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)