Strong Women Astrology: आमचा असा विश्वास आहे की प्रत्येक स्त्रीमध्ये धैर्य व कर्तृत्व सिद्ध करण्याची क्षमता असतेच. मात्र काही वेळा आपल्या जन्माच्या वेळी असणाऱ्या ग्रहमानानुसार आपल्या स्वभावावर प्रभाव पडत असतो. या गुणांमुळे काही राशींच्या व्यक्तींना आपले कर्तृत्व लवकर सिद्ध करण्याची संधी मिळू शकते तर काहींना जीवनात एक पाऊल पुढे टाकण्यासाठी थोडा वेळ लागतो. आज आपण राशीनुसार अत्यंत निडर, धैर्यवान व कर्तृत्ववान महिलांविषयी जाणून घेणार आहोत. तुमची किंवा तुमच्या ओळखीतील एखाद्या प्रतिभाशाली महिलेची रास यात आहे का नक्की तपासून पाहा.

निडर व कर्तृत्ववान महिलांच्या ‘या’ राशींमध्ये तुम्ही आहात का?

वृषभ रास (Taurus Zodiac Horoscope)

या राशीच्या महिला हट्टी व खूप तोलून मापून वागणाऱ्या असतात. यांना अपयशाची भीती वाटत नाही. त्या आपल्या ध्येयावर खूप ठाम असतात आणि त्यांची जिद्द त्यांना नेहमी स्पर्धेत टिकवून राहण्यासाठी मदत करते. त्यांना मदत मागायला आवडत नाही. या महिलांना ‘अहं’ खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे त्या समस्यांना एकट्याने तोंड द्यायचा प्रयत्न करतात. काही वेळा त्यांच्या जोडीदाराला किंवा संबंधित व्यक्तींना यामुळे कमीपणा वाटू शकतो.

सिंह रास (Leo Zodiac Horoscope)

नावाप्रमाणे या राशीच्या व्यक्तींचे कर्तृत्व असते. जोखीम घेण्यास किंवा वाट बदलण्यास त्या कधीही घाबरत नाहीत. पण त्यांना पराभव स्वीकारणे पटकन शक्य होत नाही. म्हणूनच आपल्याला हार पत्करावीच लागू नये यासाठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांची प्रमुख शक्ती ही त्यांची जिद्द व स्वतःला झोकून देण्याची वृत्ती आहे. त्या कामात कुचराई करत नाहीत.

कुंभ रास (Aquarius Zodiac Horoscope)

या स्त्रिया कणखर असतात आणि त्यांच्यात धाडसी वृत्ती असते. त्या अन्य कोणालाही त्यांच्या प्रगतीवर परिणाम करू देत नाहीत किंवा त्यांना त्यांच्या आयुष्यभराची स्वप्ने साध्य करण्यापासून थांबवू देत नाहीत. विशेष म्हणजे त्यांची शक्ती त्यांच्या भावनांमध्ये आहे. त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यात भीती वाटत नाही ज्यामुळे त्यांना निर्भीडपणे बोलण्यात संकोच वाटत नाही. त्यांच्या बोलण्यामुळे त्या आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतात.

धनु रास (Sagittarius Zodiac Horoscope)

या स्त्रिया नेतृत्व करणाऱ्या आणि आत्मविश्वासू असतात. या महिला स्वतंत्र आहेत. जीवनात पुढे जाण्यासाठी त्यांना कोणाच्याही आधाराची गरज नसते पण एखाद्या वळणावर निवांत थांबायचं जरी झालं तरी त्या बिनधास्त स्वतःच्या हिमतीवर थांबू शकतात. उच्च मूल्ये आणि नैतिकता असल्यामुळे त्यांचा मेंदू गोंधळात अडकत नाही.

हे ही वाचा<< पुढील दीड वर्षात ‘या’ लोकांच्या कुंडलीतील अडथळे होतील दूर; श्रीमंतीसह शनीदेव देतील नशिबाला कलाटणी

मेष, मिथुन, कर्क, तूळ, वृश्चिक, कुंभ आणि मीन राशीच्या महिला तुलनेने नम्र असतात. पण त्यांनाही काळाच्या ओघात आपल्या क्षमता दाखवून देता येतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader