Personality As Per Astrology: संख्याशास्त्रात विविध बाजूंचा विचार करताना भाग्यांकाचाही विचार करणे खूप आवश्यक आहे. भाग्यांक म्हणजे पूर्ण जन्मतारखेची बेरीज करून येणारा एकांक, यास भाग्यांक असे म्हणतात. भाग्यांक पहाताना आपण फक्त जन्मतारीख जन्ममहिना व जन्मवर्ष या तिन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भाग्यांक काढतांना प्रथम संपूर्ण जन्मतारीख मांडावी उदाहरणार्थ एखाद्याची जन्मतारीख असेल- १५ – ११- १९७९

जन्मदिवस १५ = १ + ५ = ६

जन्ममहिना ११ = १ + १ = २

जन्मवर्ष १९७९ = १+९+७ + ९ = २६ = ८

म्हणजे ६+२+८ = १६ = १ + ६ = ७ हा तुमचा भाग्यांक ठरतो.

यानुसार ज्या व्यक्तींचा भाग्यांक तीन हा आहे, त्यांच्या स्वभावाचे विश्लेषण पाहूया..

१) या व्यक्ती मूळातच आशावादी व स्वतंत्र विचाराच्या असतात. त्यामुळे काही विशिष्ट नीतीमूल्ये जपून आपली कामे करीत असतात.

२) उत्तम संवाद साधणे, उत्तम वक्तृत्व आणि आदर्श शिक्षक या गोष्टी यांच्यापाशी उपजत आलेल्या असतात.

३) आयुष्यातील विश्वसनीय गोष्टी तपासताना वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेवून त्यावर खोलवर विचार करून आपली मते मांडतात.

४) धाक दबावाला या व्यक्ती बिलकूल घाबरत नाहीत तसेच योग्य माणसे हेरून त्यांच्यातील कल्पकता कृतीत आणण्यासाठी यांचा प्रयत्न नेहमी यशस्वी ठरतो.

५) यांच्या स्वाभिमानी वृत्तीचे दर्शन यांच्या विनयशील पण रोखठोक बोलण्यातून दिसून येते.

६) या लोकांचा सत्यता न्याय यावर प्रचंड विश्वास असतो. त्यामुळे अन्यायाच्या काळोखात चाचपडत राहणाऱ्या लोकांना त्यातून बाहेर काढून मदत करतात.

७)सहृदयता सात्विकता धार्मिक वृत्ती मानून हे सामाजिक कार्यात मोठे योगदान देत असतात. धार्मिक संस्था ट्रस्ट यामधून यांची नित्य लोकसेवा सुरू असते.

हे ही वाचा<< श्रावणमासी बंपर धनलाभ मिळवतील ‘या’ राशी? चतुर्ग्रही योग बनल्याने तुम्हीही महिन्याभरात व्हाल कोट्यधीशांचे मालक

यांच्या जन्मतारखेला सतत येणारा तीन अंक पोटाचे अपचनाचे आजार देईल यासाठी यांनी पथ्य व जेवणाच्या वेळा सांभाळाव्यात. तसेच मूलांक सहा व सात हे अंक यांना सदैव मदतीचे ठरतात. यांनी अतिमहत्वकांक्षा जरूर ठेवाव्यात. पण अहंकार बाजूला ठेवून, म्हणजे यांचा यशाचा मार्ग अधिक सोपा होतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)