या स्पर्धात्मक युगात सर्वांचीच जीवनशैली बदलली आहे. याचा सरळ परिणाम कौटुंबिक जीवनावर होत आहे. महिला असो वा पुरुष सर्वांच्याच प्राथमिकता वेगवेगळ्या आहेत. अनेकदा लोक आपल्या या प्राथमिकतांसोबत तडजोड करत नाहीत. याच कारणामुळे घरात बऱ्याचदा भांडणं होत राहतात. असे तर घरामध्ये पतिपत्नीमध्ये वाद होणे ही सामान्य बाब आहे. परंतु जेव्हा परिस्थिती चिघळते तेव्हा हा चिंतेचा विषय होतो. अशावेळी काही उपाय केल्यास या घरगुती भांडणांपासून आपण सुटका करून घेऊ शकतो.
>> जर घरातील एखाद्या सदस्याचा स्वभाव तापट असेल आणि ही व्यक्ती भांडण करण्यासाठी सतत तयार असेल तर अशा वेळी त्यांचे जुने कपडे किंवा चप्पल शनिवारच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावे. असे केल्याने मानसिक सुख मिळते सोबतच भांडणांपासून आराम मिळतो.
रस्त्यावर पैसे सापडल्यास आवर्जून करा ‘ही’ गोष्ट; बदलेल तुमचे नशीब
>> सोमवारी शंकराच्या मंदिरात नारळ फोडावे. याशिवाय कच्च्या दुधात नारळाचे पाणी मिसळून शिवलिंगावर अर्पण करावे. उरलेल्या दुधापासून तांदळाची खीर बनवून घरातील सदस्यांना खायला द्या.
>> बुधवारी गणपतीच्या मंदिरात गणपतीला लाडूंचा नैवेद्य अर्पण करावा. यानंतर हा प्रसाद घरी आणा आणि त्यात तुळशीची पाने आणि चिरोंजी मिसळून घरातील सदस्यांना द्या. असे केल्याने घरातील संकटे दूर होतील. याशिवाय घरामध्ये वेळोवेळी भगवान सत्यनारायणाची पूजा करावी.
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)