Holi 2022 : होळी हा एक असा सण आहे जेव्हा सर्वचजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र हा उत्सव साजरे करतात. परंतु, कधी कधी आनंदाच्या प्रसंगाचे दु:खात रूपांतर होते. प्रेमाचे रूपांतर द्वेषात होते. मानवी शरीरावर रंगांचा वैज्ञानिक आणि ज्योतिषशास्त्रीय दोन्ही गोष्टींचा प्रभाव असतो. त्याचा परिणाम माणसाच्या मनोवृत्तीवरही होतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुकूल रंग आपला मूड चांगला करू शकतो. तर, चुकीचा रंग आपापसातील संघर्ष वाढवू शकतो. अशा परिस्थितीत, चुकीचे रंग टाळले पाहिजेत. जर तुम्ही तुमच्या चंद्र राशीनुसार रंग लावले किंवा कपडे घातले आणि विशेष रंग टाळले तर होळीचा सण अधिक रंगतदार होईल. यावेळी १८ मार्च रोजी होळीचा सण साजरा केला जाणार आहे. होळीच्या दिवशी आपल्या राशीनुसार कोणत्या रंगांचा वापर शुभ असेल हे जाणून घेऊया.

राशीनुसार करा रंगांचा वापर

मेष आणि वृश्चिक :

मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल, केसरी आणि गुलाबी गुलाल लावावा, तर काळा आणि निळा रंग टाळावा.

वृषभ आणि तूळ :

या राशीच्या व्यक्ती पांढऱ्या, चांदीच्या, तपकिरी रंगांनी होळी खेळण्याचा आनंद घेतील. तसेच, त्यांनी होळी खेळताना हिरवा रंग टाळावा.

मिथुन आणि कन्या :

मिथुन आणि कन्या राशींच्या व्यक्तींना हिरवा रंग अनुकूल राहील. त्यांनी लाल, केशरी रंग टाळावा.

कर्क :

या राशीच्या व्यक्तींनी या होळीला पाण्याचे रंग टाळावेत. तसेच आकाशी किंवा चंदनाचा टिळा लावावा आणि काळा आणि निळा रंग टाळावा.

सिंह :

या राशीच्या लोकांनी पिवळे, केशरी आणि सोनेरी रंग वापरावा. काळा, राखाडी, राखाडी आणि निळा रंग तुमची वृत्ती खराब करू शकतात.

धनु आणि मीन :

धनु आणि मीन राशीसाठी पिवळा-लाल-केशरी रंग वातावरण अधिक रंगीबेरंगी करण्याचे काम करतील. तुम्ही काळा रंग लावू नका.

मकर आणि कुंभ :

या राशीच्या लोकांनी काळा, निळा, राखाडी रंगाचा वापर करावा. यामुळे तुमची होळी अधिक रंगतदार होईल. पण लाल, गुलाबी गुलाल टाळा.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Find out which color will be lucky for you this holi according to your zodiac sign pvp