सूर्य आणि चंद्र ग्रहण ही खगोलीय घटना असली तरी हिंदू धर्मात ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रात प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर आपली राशी बदलत असतो. सूर्य ग्रह प्रत्येक राशीत एक महिना असतो. तर चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदलतो. या ग्रहांच्या स्थितीतील बदलाचा परिणाम लोकांच्या जीवनावर दिसून येतो. ग्रहण असो किंवा एखाद्या ग्रहाच्या राशीत बदल असो यामुळे कमी अधिक प्रमाणात फरक जाणवतोय दरवर्षी ४ ग्रहण असतात. यात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण होतात. ग्रहणकाळात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य वर्ज्य असल्याची धार्मिक मान्यता आहे. हिंदू पंचांगानुसार २०२२ सालचे पहिले ग्रहण ३० एप्रिल रोजी होणार आहे. या वर्षातील पहिले सूर्यग्रहण असेल. त्यानंतर लगेचच १५ दिवसांनी चंद्रग्रहण होणार आहे. याचा तीन राशींच्या जीवनावर विशेष प्रभाव पडेल.
मेष – २०२२ सालचे पहिले सूर्यग्रहण मेष राशीत होणार आहे. १५ दिवसांच्या अंतरानंतर चंद्रग्रहण होईल. या दोन ग्रहणांचा प्रभाव मेष राशीच्या लोकांवर असणार आहे. मेष राशीवर ग्रहणाचा शुभ प्रभाव राहील. त्यामुळे लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. त्याचबरोबर हे ग्रहण व्यावसायिकांसाठीही शुभ ठरणार आहे. नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल राहील.
सिंह – सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि चंद्रग्रहण दोन्ही शुभ ठरतील. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. पदोन्नतीची शक्यताही प्रबळ आहे. त्याच बरोबर उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर दोन्ही ग्रहणे शुभ राहतील. ग्रहण काळात तुम्हाला कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. त्याचा आर्थिक फायदा होईल.
ग्रहांचा राजा सूर्यदेव ३० दिवस राहणार मित्रराशीत, ‘या’ तीन राशींना धनलाभाचा योग
धनु – ज्योतिष शास्त्रानुसार दोन्ही ग्रहण धनु राशीच्या लोकांसाठी शुभ असतील. या काळात तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. धनसंपत्तीचा प्रबळ योग आहे. तसेच रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, तुम्हाला कोणत्याही मोठ्या कामात यश मिळू शकते.