November Horoscope in Marathi: नोव्हेंबर महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, या महिन्यात अनेक ग्रहांच्या चालीमध्ये बदल होणार आहेत. अशा परिस्थितीत सर्व राशींच्या जीवनात काही उलथा-पालथी घडून येऊ शकतात. या महिन्यात सुर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि शनि हे पाच ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. शनिदेव आपल्या स्वराशीत मार्गी होणार आहेत. सर्व ग्रहांच्या हालचालीमुळे शश आणि गजकेसरी राजयोग या महिन्यात घडून येणार आहे. त्यामुळे ज्योतिषांच्या मते, नोव्हेंबर महिन्यात ग्रहांच्या हालचाली काही राशींना विशेष लाभ देऊ शकतात. या राजयोगाच्या प्रभावामुळे चार राशींना मोठा धनलाभ होऊ शकतो. पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

नोव्हेंबरमध्ये ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा?

वृषभ राशी

पाच ग्रहांच्या हालचालीमुळे वृषभ राशींच्या लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात या राशीतील लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. मेहनतीचं अपेक्षित फळ मिळू शकतात. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होण्याची शक्यता असून या काळात उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. 

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांचा नोव्हेंबर महिना शुभ परिणाम देणारा ठरु शकतो. या काळात वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. या महिन्यात काम आणि व्यवसायात चांगलं यश मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी काही मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. 

(हे ही वाचा : ३६५ दिवसांनी मंगळ-सूर्यदेवाची वृश्चिक राशीत युती; ‘या’ ३ राशी होतील श्रीमंत? लक्ष्मीच्या कृपेने घरात येऊ शकतो पैसा )

कन्या राशी

नोव्हेंबर महिन्यात पाच ग्रहांच गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. व्यापारी वर्गाला मोठा नफा प्राप्त होऊ शकतो. आयुष्यात अनेक सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. कौटुंबिक जीवनात आनंदच आनंद राहण्याची शक्यता आहे. शेअर्स, सट्टा आणि लॉटरीतून नफा मिळू शकतो.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना बंपर लाभ घेऊन येणारा ठरु शकतो. या राशीतील लोकांच्या आरोग्यात सुधारणा होऊ शकते. करिअर आणि व्यवसायात चांगले परिणाम मिळू शकतात. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळू शकतो. या काळात वाहन किंवा मालमत्ता खरेदी करु शकता.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)