Lucky Zodiac Signs on Gudhi padwa : हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. महाराष्ट्रात गुढीपाडवा मोठा उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारली जाते. यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी २९ मार्च रोजी संध्याकाळी ४ वाजून २७ मिनिटांनी सुरू होणार असून ती ३० मार्च दुपारी १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत असेल. अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार ३० मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल. यंदा हिंदू नववर्ष विक्रम संवत 2082 चे राजा आणि मंत्री दोन्ही’सूर्य ग्रह’ असणार. या नवीन वर्षाच्या सुरुवातीला ते मीन राशीमध्ये असणार. याशिवाय चंद्र, शनि, बुध आणि राहु सुद्धा मीन राशीमध्ये असणार. त्यामुळे बुधादित्य योग, अमृतसिद्धी योग आणि सर्वार्थसिद्धी योग सारखे अनेक शुभ योगाचा संयोग निर्माण होईल. जाणून घेऊ या सर्व संयोग कोणत्या राशींचे नशीब चमकू शकतात.
वृषभ राशी
हिंदू नवीन वर्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी अपार धन लाभ देणारे ठरणार आहे. या लोकांना अप्रत्याशित धनलाभ होईल. करिअरमध्ये अचानक मोठे यश मिळू शकते. कोणतेही मोठे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. अविवाहितांचा विवाह योग जुळून येईल.
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांना अनेक प्रकरणात शुभ संयोग दिसून येईल. या लोकांना नवीन नोकरी मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत राहीन. अडकलेले पैसे परत मिळाल्याने या लोकांना दिलासा मिळू शकतो. मिथुन राशीच्या लोकांसाठी हे नवीन वर्ष फायद्याचे ठरणार आहे.
कन्या राशी
हिंदू नवीन वर्ष कन्या राशीच्या लोकांसाठी चांगली वार्ता देणारे देणारे ठरणार आहे. धन कमावण्याची या लोकांना चांगली संधी मिळेन. हे लोक पैसे वाचवण्यात यशस्वी होतील. आर्थिक प्रगतीसाठी हे नवीन वर्ष शुभ ठरणार आहे. गुंतवणूकीसाठी हा काळ उत्तम राहीन. या लोकांना मेहनतीचे फळ मिळेन.
मकर राशी
हिंदू नवीन वर्ष मकर राशीच्या लोकांना लाभ देणारे ठरणार. २९ मार्च ला शनिची साडेसाती संपणार हे त्यामुळे यांच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. धन संपत्ती वाढणार तसेच पैसा कमावण्याचे नवीन स्त्रोत मिळतील. या लोकांची करिअरमध्ये प्रगती होईल. व्यवसायासाठी हे नवीन वर्ष उत्तम मानले जाईल. या लोकांना चांगला नफा मिळू शकतो.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)