प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो. याबरोबरच तो ग्रह कधी सरळ तर कधी वक्री मार्गक्रमण करतो. ग्रहांच्या या राशी परिवर्तनाचा प्रत्येक राशीवर वेगवेगळा प्रभाव पडतो. ज्योतिषशास्त्रानुसार १० ऑगस्टला मंगळ ग्रहाने वृषभ राशीमध्ये प्रवेश केला होता. तो १६ ऑक्टोबरपर्यंत या राशीमध्ये राहील. या राशी परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीवर पडणार असला, तरीही काही राशींसाठी हा कालावधी अतिशय शुभ ठरणार आहे. पुढील २८ दिवस या राशींच्या लोकांवर मंगळ ग्रहाची विशेष कृपा असणार आहे.
- सिंह
मंगळ ग्रहाच्या वृषभ राशीतील प्रवेशामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू झाले आहेत. या राशीच्या लोकांना पुढील २८ दिवस प्रत्येक कामात यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना या काळात बढती मिळू शकते. त्याचबरोबर त्यांचा पगार वाढण्याचीही शक्यता आहे. व्यवसाय विस्तारातही फायदा होण्याची संभावना आहे.
Numerology: खूपच नशीबवान असतात ‘या’ तारखेला जन्मलेले लोक; कुटुंबासाठीही ठरतात अत्यंत भाग्यवान
- कन्या
ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीच्या लोकांसाठीही हा काळ खूप फायदेशीर आहे. या काळात अनेक रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. व्यवसायाच्या संदर्भात तुम्ही प्रवास करू शकता, जो भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळू शकते.
- वृश्चिक
या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण विशेष लाभदायक ठरणार आहे. मंगळाच्या संक्रमणामुळे या राशींच्या कुंडलीत राजयोग तयार झाला आहे. त्यामुळे या कालावधीत या राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. त्यांना व्यवसायात लाभ होईल. आर्थिक लाभामुळे या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच या काळात त्यांच्या कार्यशैलीमध्ये सुधारणा झाल्यामुळे कार्यक्षेत्रात त्यांची प्रशंसा होईल.
- धनु
ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीच्या सहाव्या घरात मंगळाचे संक्रमण झाले आहे आणि ते राशीच्या लोकांसाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकते. उरलेल्या २८ दिवसांत धनु राशीच्या लोकांच्या मार्गातील अडथळे होऊ शकतात. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. या काळात नोकरी आणि व्यवसायात संमिश्र परिणाम पाहायला मिळतील.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)