वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो किंवा युती बनवतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो. शनिदेवाने आपली राशी बदलून १२ जुलैला मकर राशीत प्रवेश केला आहे आणि सूर्य देखील कर्क राशीत बसला आहे. जुलै २०२३ पर्यंत शनी या राशीत राहील. या स्थितीमुळे संसप्तक योग निर्माण होत आहे. खरं तर आता दोन्ही ग्रह एकमेकांच्या सातव्या भावात बसले आहेत. त्यामुळे या संसप्तक योगाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. परंतु अशा ३ राशी आहेत ज्यांच्यावर पुढील सहा महिने शनिदेवाची कृपा राहील. तर जाणून घेऊया या भाग्यशाली राशींबद्दल.
वृषभ
मकर राशीत शनीचे संक्रमण झाल्यानंतर वृषभ राशीच्या लोकांनाच लाभ होऊ शकतो. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत चांगली कामगिरी कराल. काही लोकांना नवीन नोकरीच्या संधी देखील मिळू शकतात. या कालावधीत वृषभ राशींच्या लोकांचे वैवाहिक जीवनात असलेली समस्या नष्ट होतील. या राशीवर शनिदेवाची कृपा असल्याने या व्यक्तींच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे.
सिंह
सिंह राशीच्या लोकांवर पुढील सहा महिने शनिदेवाची कृपा राहील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या स्थानिकांना चांगली बातमी मिळू शकते. शत्रूंवर विजय मिळेल. वैवाहिक जीवन सुखकर राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींना हा कालावधी चांगला आहे. तसंच आधीपासून एखादे रखडलेले काम या कालावधीत पूर्ण होईल. व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी नफा होण्याची शक्यता आहे. नवीन वाहन घेण्याचा विचार असेल, तर ते काम या कालावधीत पूर्ण होईल.
( हे ही वाचा: Colours and Zodiac Sign: प्रत्येक राशीचा स्वतःचा रंग असतो, जो तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतो; जाणून घ्या तुमच्या राशीचा शुभ रंग)
मकर
मकर राशीचा अधिपती शनिदेव स्वतः आहे. शनिदेव मकर राशीत असल्यामुळे या राशीच्या लोकांना चांगला फायदाच होईल. या दरम्यान तुम्हाला अचानक आर्थिक लाभाची संधी मिळेल. करिअरमध्ये प्रमोशन मिळू शकते. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम राहील. आरोग्य चांगले राहील. एखादे रखडलेले काम पुन्हा सुरळीत चालू होईल. वैवाहिक आयुष्यात असलेले मतभेत नष्ट होतील. नवीन जागा खरेदी करण्याचा विचार असेल, तर हा काळ सर्वोत्तम आहे.
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)