Mangal Gochar 2022: देवसेनापती सध्या मेष राशीत विराजमान आहेत. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार, मंगळ १० ऑगस्ट २०२२ रोजी रात्री ९.३२ वाजता वृषभ राशीत प्रवेश करेल. वैदिक ज्योतिषात, मंगळ ग्रह हा ऊर्जा, जमीन, सामर्थ्य, धैर्य, पराक्रम, शौर्य यांचा कारक आहे. असे मानले जाते की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळाची स्थिती चांगली असते, तो धैर्यवान आणि निर्भय असतो आणि त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. ऑगस्ट महिन्यात मंगळाचे संक्रमण काही राशीच्या लोकांच्या जीवनावर वाईट परिणाम करेल. पण काही राशी आहेत ज्यांचे जीवन आनंदी असेल. मंगळ जेव्हा वृषभ राशीत प्रवेश करेल तेव्हा कोणत्या राशींना आनंद मिळेल हे जाणून घ्या.

वृषभ

१० ऑगस्ट रोजी मंगळ वृषभ राशीत भ्रमण करत आहेत. अशा स्थितीत या राशीच्या लोकांची भरभराट असेल. या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात बढती मिळेल. त्याचबरोबर अनेक दिवसांपासून रखडलेली कामेही पूर्ण होतील. यासोबतच कोर्टात सुरू असलेल्या वादातूनही सुटका होईल. शत्रूंवर विजय मिळेल.

Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ
Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश
Mangal Gochar 2025
२०२५ मध्ये मंगळ सात वेळा बदलणार राशी, ‘या’ दोन प्रिय राशींना होणार अपार धनलाभ
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये नुसता पैसा; मंगळ होणार मार्गी ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा अन् मानसन्मान
Rahu Gochar in Kumbh Rashi
२०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; राहूच्या राशी परिवर्तनाने येणार गडगंज श्रीमंती
Mars Gochar 2024
पुढील ९७ दिवस मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या दारी नांदणार लक्ष्मी

( हे ही वाचा: Shani Vakri 2022: ऑक्टोबरपर्यंत या तीन राशींवर राहील शनिदेवाची विशेष कृपा; पैशांची कमतरता भासणार नाही)

कर्क

या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमणही चांगले राहील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळेल. रखडलेली सरकारी कामे पूर्ण होतील. या राशीच्या लोकांच्या कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. यासोबतच पदोन्नती मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. पैशाची कमतरता दूर होण्यासोबतच कर्जापासूनही सुटका होईल.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण लाभदायक ठरू शकते. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असेल. यामुळे तुम्हाला व्यवसायात अधिक नफा मिळेल. जर तुम्ही कुठेतरी गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी चांगला ठरेल.

( हे ही वाचा: Budh Rashi Parivartan 2022: बुध सिंह राशीत आला आहे; आतापासून ‘या’ राशींचे भाग्य बदलेल)

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण लाभदायक राहील. या राशीच्या लोकांना स्वतःच्या बळावर यश मिळेल. कठोर परिश्रम करण्यापासून कधीही मागे हटू नका. यासह, येत्या काळात आर्थिक नफा होण्याची संभावना आहे.

कुंभ

मंगळ परिवर्तनाचा प्रभाव कुंभ राशीसाठीही चांगला राहील. वैवाहिक जीवनात आनंद राहील. तुम्ही एखादे वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही या काळात खरेदी करू शकता. यासोबतच आर्थिक आणि शारीरिक स्थितीही योग्य राहील.

Story img Loader