Four Rajyog In Horoscope: वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह वेळोवेळी राजयोग तयार करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. तसेच या योगांचा प्रभाव एखाद्या व्यक्तीसाठी शुभ तर कोणासाठी अशुभ असू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार २० वर्षांनंतर ४ राजयोग तयार होत आहेत. या राजयोगांची नावे आहेत- सत्कीर्ती, हर्ष, भारती आणि वरिष्ठ अशी आहेत. या राजयोगांचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. पण अशा ३ राशी आहेत, ज्यांना या राजयोगांच्या निर्मितीमुळे आर्थिक लाभ होऊ शकतो.चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धनु राशी

चार राजयोग तयार झाल्याने धनु राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण शनिदेवाच्या संक्रमणादरम्यान धनु राशीच्या लोकांना शनिच्या साडेसतीपासून मुक्ती मिळाली आहे. त्यामुळेच तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. तसच या काळात तुम्ही एखादे वाहन किंवा जमीन खरेदी करू शकता. दुसरीकडे राजकारणाशी संबंधित असलेल्यांना काही पद मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढेल.

वृषभ राशी

चार राजयोग बनल्याने तुमचे चांगले दिवस सुरू झाले आहेत. यावेळी तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. तसेच जे सरकारी नोकऱ्यांची तयारी करत आहेत त्यांना नोकऱ्या मिळू शकतात. याशिवाय एप्रिलमध्ये तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. तसेच, यावेळी तुम्हाला तुमच्या कामात यश मिळू शकते. या दरम्यान समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमची कीर्ती वाढेल. या दरम्यान, तुम्हाला कामाच्या ठिकाणी वेतनवाढ किंवा पदोन्नती मिळू शकते. दुसरीकडे, जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.

( हे ही वाचा: शनि अमावस्येला ‘या’ राशींचे नशीब पालटणार? २१ जानेवारी पासून तुम्हीही होऊ शकता अपार श्रीमंत)

तूळ राशी

चार राजयोग तयार झाल्याने तूळ राशीसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण तुम्हाला १७ जानेवारीपासून शनिच्या साडेसतीपासून सुटका मिळाली आहे. त्यामुळे जे व्यापारी आहेत त्यांना त्यांच्या व्यवसायात नफा मिळू शकतो. तुमच्या मेहनतीतून तुम्हाला भरपूर पैसे मिळण्याची शक्यता आहे. तसच याकाळात नोकरी किंवा व्यवसायात केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. याशिवाय आरोग्यातही सुधारणा होईल. यासोबतच तुम्हाला काम किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही चांगली बातमी देखील मिळू शकते. जे अविवाहित लोकं आहेत त्यांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.

(वरील बातमी माहिती आणि गृहितके यांवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four auspicious rajyog made in horoscope these zodiac sign can get huge amount of money gps