भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायची या संकल्पनेचे प्रतीकात्मक सांस्कृतिक रूप म्हणजे रक्षाबंधनाचा सण. श्रवणतील महत्त्वाच्या सणांमध्ये रक्षाबंधनाचाही समावेश होतो. या सणामागे विविध कहाण्या प्रचलित आहेत. प्रदेशानुसार कहाण्या बदलल्या तरी आपल्या माणसाला प्रेमाच्या रेशीमबंधांनी जखडून ठेवायचे, ही कल्पना मात्र सगळीकडे समान आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो म्हणून प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.
देशभरातील भाऊबहीण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला भेटवस्तूही देतात. यंदा ११ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे. शुभ मुहूर्ताच्या वेळी भावाला राखी बांधल्यास हे फलदायी सिद्ध होते. यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी एक किंवा दोन नाही तर तब्बल चार शुभ योग तयार होत आहेत. रक्षाबंधनसाठी ११ ऑगस्टला सकाळी १० वाजून २८ मिनिटांनी शुभ मुहूर्त सुरू होऊन १२ ऑगस्टला सकाळी ७ वाजून ५ मिनिटांपर्यंत राहील. या दरम्यान राखी बांधणे शुभ राहील.
Astrology: अत्यंत बुद्धिवान आणि चतुर असतात ‘या’ राशींचे लोक; वेगाने गाठतात यशाचे शिखर
रक्षाबंधनच्या दिवशी एकाच वेळी चार योग तयार होत आहेत. यामुळे या सणाचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. १ ऑगस्टला संध्याकाळी ७ वाजून ३५ मिनिटांपासून ते पुढील दिवशी ११ ऑगस्टला दुपारी ३ वाजून ३१ मिनिटांपर्यंत आयुष्मान योग तयार होत आहे. याशिवाय ११ ऑगस्टला सकाळी ५ वाजून ३० मिनिटांपासून ते ६ वाजून ५३ मिनिटांपर्यंत रवी योग असेल आणि दुपारी ३ वाजून ३२ मिनिटांपासून १२ ऑगस्टला सकाळी ११ वाजून ३३ मिनिटांपर्यंत सौभाग्य योग राहील.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहितके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)