Sukarma Rajyog And Shani- Guru Yuti: आज श्रावण महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी एक अत्यंत दुर्मिळ असा सुकर्म योग जुळून आला आहे. ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस आणि पुढील महिन्याभराचा कालावधी राशीचक्रातील सहा राशींच्या कुंडलीत सुकर्मा योग कायम असणार आहे. वैदिक ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, श्रावणी पौर्णिमा आज समाप्त होत आहे. रक्षाबंधनाला शनी- गुरु युती जुळून आली होती तर चंद्र सुद्धा शनीच्या कुंभ राशीवर प्रभावी होता. या ग्रहसंगमाने सुकर्म योग जुळून आला आहे. अशातच आज गुरुवार असल्याने या योगाचे महत्त्व आणखीनच वाढले आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज शनीदेव गुरूच्या शततारक नक्षत्रात प्रभावी असणार आहेत. शनीची मूळ स्थिती ही अद्यापही शतभिषा नक्षत्रातच आहे मात्र गोचर प्रभावामुळे गुरूच्या नक्षत्रातही शनी प्रभाव जाणवेल. ग्रहांच्या प्रभावामुळे आणि शुभ योगामुळे भगवान विष्णू सहा राशींच्या भाग्यात महत्त्वाचे बदल घडवून आणू शकतात. कोणत्या राशींना कसा लाभ होण्याची चिन्हे आहेत हे पाहूया …

Malavya rajyog in meen
शुक्र देणार गडगंज श्रीमंती! मालव्य राजयोगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश
Surya and Mangal make pratiyuti yog 2025
१६ जानेवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार भरपूर यश अन् सूर्य-मंगळाच्या आशीर्वादाने नव्या नोकरीसह बक्कळ पैशाचा लाभ
Rahu Shukra Yuti In Uttarabhadra Nakshatra
१८ वर्षांनंतर मित्र ग्रह शुक्र आणि राहूची युती! ‘या’ राशीच्या लोकांच्या नशीबाचे टाळे उघडणार, मिळेल अपार पैसा
The effect of the Sun's Mahadasha lasts for 6 years on a person
Surya Mahadasha: सूर्याच्या महादशेमुळे कोणत्या राशींचे नशीब चमकते करिअर अन् व्यवसाय? मिळते अपार धन-संपत्ती, ६ वर्षांसाठी राहतो प्रभाव
Rahu's entry into Saturn's Nakshatra
राहूचा शनीच्या नक्षत्रातील प्रवेश ‘या’ तीन राशींना देणार; पैसा आणि ऐश्वर्याचे सुख
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार

आजपासून दत्त गुरु व भगवान विष्णू ‘या’ ६ राशींना देणार आशीर्वाद

मेष रास (Aries Zodiac Horoscope)

तिसरा श्रावणी गुरुवार मेष राशीच्या लोकांसाठी नशिबाचे दार उघडणारा ठरू शकतो. अनेक अपूर्ण कामे नशिबाच्या मदतीने पूर्ण होतील. नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल. सामाजिक कार्यकर्त्यांचा मान वाढू शकतो. संपत्तीचे शुभ योग जुळून येऊ शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. व्यापारी वर्गाला दिवसभर कामात स्वतःला झोकून द्यावे लागेल पण त्याचा परिणाम हा अत्यंत लाभदायक दिसून येत आहे.

मिथुन रास (Gemini Zodiac Horoscope)

तिसरा श्रावणी गुरुवार मिथुन राशीच्या व्यक्तींना अचानक संपत्तीत वाढ घेऊन येऊ शकतो. भगवान विष्णूच्या कृपेने आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. व्यावसायिकांची मेहनत यशस्वी होईल. मान-सन्मान वाढू शकतो. प्रतिस्पर्ध्यांना खडतर स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील सदस्यांशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकते. घरात उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

कन्या रास (Virgo Zodiac Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी तिसरा श्रावणी गुरुवार आनंददायी ठरू शकतो. घरात आनंदाचे वातावरण असू शकते. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांचे सहकार्य मिळेल. मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. धार्मिक कार्यात रुची वाढेल. वडिलांशी संबंध चांगले राहतील. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होऊ शकते. संवाद कौशल्य उत्कृष्ट असेल.

तूळ रास (Libra Zodiac Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी तिसरा श्रावणी गुरुवार लाभदायक ठरू शकतो. भगवान विष्णूच्या कृपेने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तुम्ही सामाजिक उपक्रमात सहभागी होऊ शकता. मान-सन्मान वाढू शकतो. व्यवसायासाठी काही नवीन योजनांवर काम करू शकता. जे चांगला नफा देईल. उत्पन्न वाढवण्यासाठी कर्मचारी दुसऱ्या कंपनीत जाण्याचा विचार करू शकतात. नशिबाच्या सहकार्याने धनप्राप्ती होऊन सुख-समृद्धी लाभेल.

वृश्चिक रास (Scorpio Zodiac Horoscope)

वृश्चिक राशीसाठी तिसरा श्रावणी गुरुवार अनुकूल राहील. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे चांगले प्रस्ताव मिळू शकतात. भगवान विष्णूच्या कृपेने दीर्घकाळ चाललेल्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. कौटुंबिक जीवनाचा आनंद घेता येईल.

हे ही वाचा<< ४० व्या वर्षीपासून करोडपती होऊ शकतात ‘ही’ मंडळी; तुमच्या हातावर मध्यभागी असं चिन्ह आहे का, पाहा

कुंभ रास (Aquarius Zodiac Horoscope)

तिसरा श्रावणी गुरुवार कुंभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकतो. आई-वडिलांच्या आशीर्वादाने केलेले काम खूप फायदेशीर ठरेल. चांगली बातमी मिळू शकते. नातेवाईकांच्या मदतीने प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. मनावरील ओझे हलके करता येईल. एखादा नवीन व्यवसाय किंवा काम सुरु करण्यासाठी हा लाभदायक कालावधी आहे. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader