Venus Transit in dhanishta nakshatra: ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. शुक्राच्या राशी परिवर्तनाबरोबर त्याचे नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. येत्या २२ डिसेंबर रोजी रात्री १० वाजून २५ मिनिटांपासून शुक्र धनिष्ठा नक्षत्रामध्ये प्रवेश करेल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुक्र करणार मालामाल

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींना शुक्राचे राशी परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मि्ळेल. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच प्रमोशनही मिळेल.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींनाही शुक्राचा धनिष्ठा नक्षत्रातील प्रवेश अत्यंत फायदेशीर सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमचे भाग्य चमकेल. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त रहाल. आयुष्यात आनंदी आनंद असेल.

हेही वाचा: शनी ‘या’ तीन राशींना देणार बक्कळ पैसा; मीन राशीतील राशी परिवर्तनाने देवी लक्ष्मी होणार प्रसन्न

मकर

मकर राशीच्या व्यक्तींना शुक्राचे नक्षत्र परिवर्तन खूप सकारात्मक सिद्ध होईल. या काळात आयुष्यात नव्या गोष्टी करण्याची संधी मिळेल. पैशांची कमतरता भासणार नाही. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील.अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील. नवीन वस्तू खरेदी कराल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: From december 22 venus in dhanishta nakshatra these three signs will get material happiness sap