Budh Uday In Scorpio : दिवाळीनंतर अनेक महत्त्वाच्या ग्रहांच्या चालीत बदल होणार आहे. ज्यामध्ये ग्रहांचा राजकुमार बुध याचाही समावेश आहे. व्यवसायासाठी लाभदायक मानला जाणारा बुध ग्रहाचा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १३ नोव्हेंबर रोजी उदय होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसणार आहे. परंतु ३ राशी अशा आहेत ज्यांना बुधाच्या उदयामुळे विशेष लाभ मिळू शकतो. त्यामुळे या राशींचे नशीब उजळू शकते, त्यांना व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
वृश्चिक रास –
बुधाचा उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण बुध ग्रह तुमच्या राशीतून लग्न स्थानी उदित होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होऊ शकते. तुमची कार्यशैली चांगली असू शकते, तर बुद्धीच्या जोरावर तुम्ही अनेक चांगले निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल, जे तुमच्या हिताचे ठरु शकतात. बुध तुम्हाला करिअरमध्येही तुम्हाला खूप साथ देऊ शकतो. तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहू शकते. तसेच तुम्हाला जोडीदाराकडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. बुध तुमच्या राशीतून सातव्या आणि कर्म स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते.
मकर रास
मकर राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय शुभ ठरु शकतो. कारण बुध ग्रह तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या स्थानी उदित होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पनात वाढ होऊ शकते. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठीही हा काळ उत्तम ठरु शकतो. तसेच तुम्हाला गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. बुध हा तुमच्या राशीचा स्वामी शनिदेवाचा मित्र आहे, त्यामुळे बुधाचा उदय तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो.
कन्या रास
बुधाचा उदय कन्या राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण बुध ग्रह तुमच्या गोचर कुंडलीच्या तृतीय स्थानी उदित होणार आहे, ज्यामुळे इथे बुध बलवान बनणार आहे. या काळात तुम्हाला भावा-बहिणींचे सहकार्य मिळू शकते. तसेच तुम्ही जे काही काम कराल, त्यातून तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे जीवन आनंदी राहू शकते. तसेच, जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला या काळात चांगला नफा मिळू शकतो. बुध ग्रह तुमच्या राशीच्या दहाव्या स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे व्यवसायात तुम्हाला भरमसाठ नफा होऊ शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)