Gajkesari Yog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. चंद्र एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. अशा स्थितीत चंद्र कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी जोडला जातो. ज्यामुळे शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतात. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीमुळे शुभ राजयोगही निर्माण होत असतात. यातच आता गुरु आणि चंद्राच्या संयोगाने २० एप्रिल रोजी एक अत्यंत शुभ असा गजकेसरी राजयोग निर्माण होणार आहे. गजकेसरी राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांच्या जीवनात अद्भूत बदल घडून येतील. लोकांना त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश आणि प्रगती मिळणार आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी? चला, जाणून घेऊया.
‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरु होण्याची शक्यता
वृषभ
गजकेसरी राजयोगामुळे वृषभ राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. उच्च अधिकारी खूश होऊन तुम्हाला काही मोठी जबाबदारी देऊ शकतात. प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवनातही आनंद मिळू शकतो. न्यायालयीन प्रकरणांमध्येही तुम्हाला यश मिळू शकणार आहे. कुटुंबातील सुख-सुविधांमध्येही वाढ होऊ शकते.
कन्या
गजकेसरी राजयोगामुळे कन्या राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. व्यवसायातही मोठे बदल होऊ शकतात. या काळात योग्य गुंतवणूक केल्यास आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. करिअरच्या क्षेत्रातही लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता, जो फायदेशीर ठरु शकतो. कोणत्या ठिकाणी पैसे अडकलेले असतील तर ते मिळू शकणार आहे. या काळात, तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. यावेळी, शेअर बाजार, सट्टेबाजी आणि लॉटरीमधून नफा होऊ शकतो.
मकर
गजकेसरी राजयोगामुळे मकर राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. यावेळी तुम्हाला मालमत्ता आणि जमिनीतून फायदा होऊ शकतो. नोकरी आणि व्यवसायातही प्रगतीच्या संधी मिळू शकतात. प्रवासाची दाट शक्यता आहे, ज्यातून तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करू शकता. समाजात तुम्हाला खूप मान-सन्मान मिळेल. वैवाहिक जीवनातील समस्यांपासून सुटका मिळून कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतील आणि सर्वांशी नातेसंबंध सुधारतील.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)