Shravan Month Astrology : श्रावण महिना हा महादेवाचा प्रिय महिना मानला जातो. उत्तर भारतीय पंचांगानुसार २२ जुलैला श्रावण महिना सुरू झाला आहे. त्यानुसार २९ जुलैला दुसरा श्रावण सोमवार येईल. या दिवशी चंद्र वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे, जिथे गुरू आधीच विराजमान आहे. अशात चंद्र आणि गुरु या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे गजकेसरी योग निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गजकेसरी योग अत्यंत शुभ मानला जातो.
हिंदू पंचागनुसार या दिवशी भरणी आणि कृतिका नक्षत्राबरोबर गजकेसरी योग निर्माण होत आहे. त्याचबरोबर त्रिग्रही योग निर्माण होत आहे. त्यामुळे २९ जुलै हा दिवस अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. दोन्ही ग्रहाच्या युतीमुळे कोणत्या राशींना याचा फायदा दिसून येईल, जाणून घेऊ या.
मेष राशी
ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या दुसऱ्या स्थानावर गजकेसरी आणि त्रिग्रही योग निर्माण होत आहे. यामुळे या राशींच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. महादेवाच्या कृपेने या लोकांच्या समस्या दूर होतील तसेच कामाच्या ठिकाणी या लोकांची अडचणींतून सुटका होईल. त्यांच्या कामाचे कौतुक केले जाईल. पदोन्नतीबरोबर मोठ्या जबाबदाऱ्या यांना मिळू शकतात ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो. या लोकांचा धाडसीपणा वाढेल आणि समाजात मान सन्मान सुद्धा वाढेल.
वृषभ राशी
या राशीच्या लग्न स्थानात गजकेसरी योग निर्माण होत आहे. अशात या लोकांनासुद्धा श्रावण सोमवारचा लाभ मिळू शकतो. या दरम्यान या लोकांच्या कुटुंबातील समस्या दूर होतील. यांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना अनेक नव्या संधी मिळू शकतात. व्यवसायात सुद्धा यांना नशीबाची साथ मिळेल. या लोकांचे पैसा कमावण्याचे स्त्रोत वाढतील. तसेच या दरम्यान वाहन, संपत्ती आणि दागिने खरेदी करण्याचा योग जुळून येईल.
मकर राशी
ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या लोकांवर महादेवाची कृपा दिसून येईल. या दरम्यान या लोकांची अडकलेली कामे मार्गी लागतील. समाजात यांचा मान सन्मान वाढेल. या काळात या राशीचे लोक अध्यात्माकडे वळताना दिसेल. कुटुंबाबरोबर हे लोक चांगला वेळ घालवतील. याशिवाय हे लोक जोडीदाराबरोबर धार्मिक स्थळी जाऊ शकतात. या लोकांच्या जीवनात सुख शांती लाभेल. काम पाहून यांचा पगारवाढ होऊ शकतो.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)