Gajakasari Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. चंद्र एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. अशा स्थितीत चंद्र कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी जोडला जातो. ज्यामुळे शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतात. २ एप्रिल २०२५ रोजी चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार असून या राशीत गुरू ग्रहदेखील विराजमान आहे. त्यामुळे वृषभ राशीत चंद्र आणि गुरू यांची युती निर्माण होईल, ज्यामुळे गजकेसरी राजयोग निर्माण होईल. या राजयोगाच्या प्रभावाने १२ राशींच्या व्यक्तींवर त्याचा शुभ परिणाम पाहायला मिळेल. या योगाच्या प्रभावाने या राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामात यश, आनंद आणि सुख मिळेल.
गजकेसरी राजयोग देणार प्रत्येक कामात यश
वृषभ
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा योग अत्यंत सकारात्मक ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. पार्टनरबरोबर चांगला वेळ घालवाल. उत्पन्नात वाढ होईल. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील.
कर्क
गजकेसरी राजयोग कर्क राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल. या काळात समाजात मान-सन्मान वाढेल. तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल.
सिंह
हा राजयोग सिंह राशीसाठी खूप लाभदायी ठरेल. या काळात तुम्हाला अनेक गोष्टी प्राप्त करण्यास मदत मिळेल. कुटुंबातील व्यक्तींबरोबर फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात काही अडचणी येतील; पण तुम्ही त्या दूर करण्यास सक्षम असाल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल, भौतिक सुख-सुविधा प्राप्त कराल.
(टीप: सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)