Gajakesari and Malvya Raja Yoga: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. चंद्र एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. अशा स्थितीत चंद्र कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी जोडला जातो. ज्यामुळे शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतात. येत्या जानेवारी महिन्यात गुरू आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेसरी राजयोग निर्माण होत आहे. तसेच शुक्राच्या उच्च राशीतील प्रवेशाने मालव्य राजयोग निर्माण होत आहे. या दोन्ही राजयोगाच्या प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गजकेसरी, मालव्य राजयोग करणार मालामाल

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हे राजयोग खूप सकारात्मक सिद्ध होतील. या काळात तुम्हाला मनासारखी नोकरी मिळेल. धन-संपत्तीत वाढ होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. या काळात समाजात मान-सन्मान वाढेल. तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल.

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींनाही हे काळात तुम्हाला आकस्मिक धनाची प्राप्ती होईल. पार्टनरबरोबर चांगला वेळ घालवाल. उत्पन्नात वाढ होईल. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, या काळात मकर राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.

हेही वाचा: २०२५ मध्ये १३८ दिवस शनीची वक्री चाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना करणार मालामाल

मीन

मीन राशीच्या व्यक्तींसाठीही हे दोन्ही राजयोग खूप अनुकूल सिद्ध होतील. या काळात आई-वडिलांची प्रत्येक कामात साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी मोठी पार पाडाल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल, भौतिक सुख-सुविधा प्राप्त कराल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात काही अडचणी येतील; पण तुम्ही त्या दूर करण्यास सक्षम असाल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gajakesari and malvya raja yoga will be created sudden financial gain will happen to these three zodiac persons sap