Gajakesari Raja Yoga: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. तो एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. अशा स्थितीत चंद्र कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी जोडला जातो. ज्यामुळे शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतात. दरम्यान, गुरू ग्रह सध्या वृषभ राशीत विराजमान आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र आणि गुरू एकाच राशीत येतात तेव्हा ‘गजकेसरी राजयोग’ निर्माण होतो, हा योग खूप शुभ मानला जातो. या योगामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होते. या शुभ योगामुळे १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींना आयुष्यात सुख-समृद्धी प्राप्त होते.

shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
surya gochar 2024 astrology horoscope in marathi
Surya Gochar 2025 : १५ डिसेंबरपासून करोडपती होऊ शकतात ‘या’ तीन राशींचे लोक; सूर्यदेवाच्या कृपेने जगू शकतात राजासारखे जीवन?
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Shukra Nakshatra parivartan 2024
उद्यापासून पडणार पैशांचा पाऊस; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींना होणार भौतिक सुखाची प्राप्ती
Budh Uday In Scorpio 2024 horoscope 2025
Budh Uday 2024 : ९ तासांनंतर बुध उदयाने एका झटक्यात ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळेल कलाटणी; तुम्हीही व्हाल कोट्यधीश?
Guru gochar gajkesari rajyog horoscope 2025 in marathi
२०२५ चा गजकेसरी राजयोग ‘या’ तीन राशींची करु शकतो आर्थिक भरभराट, हत्तीवरुन वाटाल साखर
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा

पंचांगानुसार, १३ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजून १८ मिनिटांनी चंद्र वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार असून या राशीत आधीपासूनच गुरू ग्रह विराजमान आहे. त्यामुळे चंद्र आणि गुरूची युती गजकेसरी राजयोग निर्माण करेल.

गजकेसरी योग तीन राशींसाठी ठरणार लाभदायी

वृषभ

या राशीच्या लग्न भावात हा योग निर्माण होत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला मनासारखी नोकरी मिळेल. धन-संपत्तीत वाढ होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. या काळात समाजात मान-सन्मान वाढेल. तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींनाही गजकेसरी योगाचा खूप फायदा होईल. या काळात आई-वडिलांची प्रत्येक कामात साथ मिळेल. सकारात्मक राहाल. कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळेल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल, भौतिक सुख-सुविधा प्राप्त कराल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात काही अडचणी येतील; पण तुम्ही त्या दूर करण्यास सक्षम असाल.

हेही वाचा: २०२५ मध्ये सूर्य-शनीची युती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक क्षेत्रात यश

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींनाही गजकेसरी योग अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनाची प्राप्ती होईल. पार्टनरबरोबर चांगला वेळ घालवाल. उत्पन्नात वाढ होईल. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, या काळात मकर राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader