GajKesri Rajyog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्ष २०२५ मध्ये चंद्राचा गुरुशी संयोग होईल, ज्यामुळे गजकेसरी योग तयार होईल. हा योग ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ मानला जातो. वैदिक दिनदर्शिकेनुसार २८ मे २०२५ रोजी १२ वर्षांनी अशाप्रकारे गजकेसरी योग तयार होईल. द्रिक पंचांगनुसार, १४ मे रोजी गुरू ग्रह वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. यासह २८ मे रोजी दुपारी १ वाजून ३६ मिनिटांनी चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल आणि ३० मेपर्यंत या राशीत राहील. अशा स्थितीत गुरू आणि चंद्राच्या संयोगामुळे गजकेसरी योग तयार होईल. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु आणि चंद्राच्या संयोगाने तयार झालेला गजकेसरी योग काही राशींसाठी खूप शुभ सिद्ध होऊ शकतो. हा योग संपत्ती, करिअर, शिक्षण आणि कौटुंबिक जीवनात मोठे बदल घडवून आणेल. अशा स्थितीत जाणून घेऊया कोणत्या राशींच्या लोकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.

i

i

मिथुन

ज्योतिषशास्त्रानुसार, २०२५ मध्ये पहिल्यांदा २८ मे २०२५ रोजी मिथुन राशीमध्ये गुरु आणि चंद्राचा संयोग होईल. अशा परिस्थितीत मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खूप चांगले असणार आहे. या वर्षी तुमच्या आर्थिक अडचणी कमी होऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना २०२५ मध्ये नोकरीत बढती, उत्पन्नात वाढ आणि कर्जमुक्ती मिळू शकते. करिअरमध्ये प्रगती साधता येऊ शकते. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवता येऊ शकतो. प्रवास आणि धार्मिक कार्यांत मन रमेल. कुटुंबात सुख-शांती नांदू शकते. कामात यश मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित लोकांना चांगला नफा मिळू शकेल.

कन्या
कन्या राशीच्या लोकांना गजकेसरी योगाचा विशेष फायदा होईल. सुख-सुविधेत वाढ होईल. शिक्षण आणि करिअरमध्ये यश मिळू शकेल. परदेशात शिकण्याची किंवा नोकरी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा उत्तम काळ आहे. वाहन खरेदी आणि लग्नाचे योग जुळून येतील, वैवाहिक जीवनात आनंद राहील. जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिटू शकतात. घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल. कौटुंबिक व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी केलेल्या योजना यशस्वी होऊ शकतात. नात्यात गोडवा येईल.

कुंभ

कुंभ राशीसाठी गजकेसरी राजयोग अतिशय शुभ राहील. साडेसातीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मोठे यश मिळू शकते. आर्थिक लाभ होईल आणि संतती सुखी होण्याची शक्यता आहे. अभ्यासात चांगले परिणाम दिसून येतील. धार्मिक व अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. वडील आणि सासरचे सहकार्य मिळेल. सासरच्या घरात शुभ कार्य घडेल. वैवाहिक जीवनात इच्छुक लोकांना चांगली स्थळं येऊ शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळू शकेल. नोकरीत पगार वाढण्याची आणि व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

Story img Loader