Guru and Shukra Yuti 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. गुरू सध्या वृषभ राशीत असून तो १४ मे २०२५ रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत गुरू एक वर्ष राहील. त्यामुळे या राशीत गुरू आणि शुक्राची युती निर्माण होईल, गुरू-शुक्राची युती गजलक्ष्मी राजयोग निर्माण करते. हा योग अत्यंत शुभ आणि भाग्यकारी मानला जातो.

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह २६ जुलै रोजी सकाळी ९ वाजून २ मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करेल. जो या राशीत २१ ऑगस्टपर्यंत अस्त राहील. शुक्राचा मिथुन राशीत प्रवेश होताच हो योग निर्माण होईल. ज्याचा काही राशींवर शुभ प्रभाव पाहायला मिळेल.

Shani Transit 2025
येणारे ६५ दिवस शनी देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार धन-संपत्ती आणि ऐश्वर्य
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Six Planets yuti created Auspicious Sanyog at a time
एक दोन नव्हे तर सहा ग्रह एकत्र येणार अन् पाच राशींचे धनी होणार! गडगंज श्रीमंती व सुखाने न्हाऊन निघाल
Weekly Horoscope 27January To 2 Febuary 2025
Weekly Horoscope 27January To 2 February 2025: जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ‘या’ ६ राशींचे उजळणार भाग्य! मिळणार चांगली बातमी, १२ राशींचे साप्ताहिक राशिभविष्य
Acharya Chanakya's Chanakya Niti
Chanakya Niti: आयुष्यात प्रचंड पैसा अन् धन संपत्ती कमवायची असेल तर चाणक्य नीतिने सांगितलेल्या ‘या’ तीन सवयी अंगीकारा, मिळेल अपार श्रीमंती
27 January 2025 Horoscope In Marathi
२७ जानेवारी पंचांग: मासिक शिवरात्रीने होणार आठड्याची सुरुवात; कोणाला मिळेल मेहनतीचे फळ तर कोणाला नोकरीच्या नवीन संधी?
Shatgrahi Yog 2025 six planets auspicious yog in pisces
Shatgrahi Yog 2025 : २९ मार्चनंतर ‘या’ राशींचे खुलणार नशीब, मीन राशीतील शतग्रही योगाने मिळणार अमाप पैसा अन् कामात यश
Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा

गजलक्ष्मी राजयोग ठरेल भाग्यकारी

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी गजलक्ष्मी राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. या राशीच्या अकराव्या घरात ही युती निर्माण होईल. त्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. पैशांची तंगी दूर होण्यास मदत होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींना गजलक्ष्मी राजयोग भाग्यकारी ठरेल. हा योग तूळ राशीच्या नवव्या घरात निर्माण होत आहे. त्यामुळे या काळ तुमच्यासाठी भौतिक सुखाची प्राप्ती करून देणारा असेल. या युतीच्या प्रभावाने तुमच्या आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. धार्मिक कार्यात अधिक रस निर्माण होईल. धन-संपत्ती प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान प्राप्त होईल. तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेट द्याल. या काळात तुमचे नशीब तुमच्या बाजूने असेल.

धनु

धनु राशीच्या व्यक्तींसाठी गजलक्ष्मी राजयोग खूप फायदेशीर ठरेल. या राशीच्या सातव्या घरात हा योग निर्माण होईल. या योगाच्या प्रभावाने तुमच्या देवी लक्ष्मीची कृपा होईल. त्यामुळे या काळात अचानक धनलाभ, भौतिक सुखाची प्राप्ती होईल. अनेक दिवसांपासून अडकलेले कामही पूर्ण होण्यास मदत मिळेल. नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. प्रेमप्रकरणांमध्ये जोडीदाराबरोबर आनंदाचे क्षण व्यतीत कराल. या काळात गुरूच्या सानिध्यात राहिल्यास गुरूचा आर्शीवाद प्राप्त होईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader