Gajkesari & Trikon Rajyog August 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह हा वेळोवेळी गोचर करत असतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत मार्गी होणे याला गोचर असे म्हणतात. या ग्रहस्थितीचा प्रभाव हा १२ राशींच्या भविष्यात दिसून येतो. प्रत्येक महिन्यात विविध ग्रहांचे गोचर होत असते. तसेच ऑगस्ट महिन्यात सुद्धा शुक्र, सूर्य, बुध गोचर होणार आहे. हे ग्रह ज्यावेळी आपल्या भ्रमण कक्षेत एकत्र येतील तेव्हा त्यातून दोन अत्यंत शुभ राजयोग सुद्धा निर्माण होणार आहेत. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात दोन्ही पंधरवड्यात अनुक्रमे गजकेसरी व केंद्र त्रिकोण राजयोग तयात होत आहे. यामुळे काही राशींच्या भाग्यवान धनप्राप्तीचा योग आहे. हा राजयोग तुमच्या राशीत आहे का हे पाहूया…

ऑगस्ट महिन्यात ‘या’ राशींवर बरसणार पैशांचा पाऊस?

मेष रास (Aries Zodiac Horoscope)

मेष राशीच्या मंडळींसाठी गजकेसरी व केंद्र त्रिकोण राजयोग हा अत्यंत शुभ फलदायी असणार आहे. या मंडळींनी आयुष्यात खूप वर्ष मेहनत केली आहे, त्याच जोरावर आता त्यांच्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटेल. तुम्हाला बँकेतील गुंतवणुकीचा मोठा परतावा मिळण्याची चिन्हे आहेत. आपले आर्थिक मिळकतीचे स्रोत वाढतील त्यामुळे नोकरी व्यवसायात नवनवीन प्रयोग करत राहायला हवे. प्रवासाचा योग आहे.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
Tourists unaware of public holiday rules crowd in front of Veermata Jijabai Bhosale Park
सार्वजनिक सुट्टीच्या नियमाबाबत अनभिज्ञ पर्यटकांची राणीच्या बागेसमोर गर्दी
yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
Maharashtra Public Holiday 2025 List in Marathi
Maharashtra Holiday List 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांची यादी जाहीर! २४ सार्वजनिक सुट्ट्यांसह मिळेल ‘ही’ एक्स्ट्रा सुट्टी

तूळ रास (Libra Zodiac Horoscope)

तूळ राशीच्या मंडळींसाठी गजकेसरी राजयोग हा राजेशाही आयुष्य जगण्याची सुरुवात घेऊन येऊ शकतो. तर केंद्र त्रिकोण राजयोग तुम्हाला मानसिक स्थैर्य देण्याचे काम करेल. यामुळे दोन्ही बाजूंनी तुमची भरभराट होणार आहे. कौटुंबिक सुखाने मन आनंदून जाईल तर कामाच्या ठिकाणी काही अंशी निराशा होऊ शकते. अधिकाधिक पैसे गुंतवण्यावर भर द्या.

हे ही वाचा<< दुसऱ्याकडून काम काढून घेण्यात खूप हुशार असतात ‘या’ राशीचे लोक; बोलणं इतकं गोड की शंकाही येत नाही

मकर रास (Capricorn Zodiac Horoscope)

मकर राशीच्या लोकांना गजकेसरी व केंद्र त्रिकोण राजयोग लाभदायक ठरू शकतात. तुम्हाला जमीन किंवा घर अशा प्रॉपर्टीच्या खरेदीची संधी मिळू शकते. पुढील महिनाभर तुम्हाला उत्साही वातावरण अनुभवायला मिळू शकते. समाजातील तुमचे स्थान अधिक मानाचे होईल. लक्ष्मीसह सरस्वतीचा सुद्धा कृपाशिर्वाद लाभू शकतो. वाडवडिलांच्या संपत्तीचा मोठा लाभ या काळात आपल्याला प्राप्त होण्याची चिन्हे आहेत.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader