Gajkesari Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुदेव एक वर्षानंतर राशी बदल करतात. त्यांना एका राशीत परत येण्यासाठी सुमारे १२ वर्षांचा कालावधी लागतो. आता गुरु ग्रह वृषभ राशीत आहे. परंतु १४ मे रोजी गुरु शुक्र राशी सोडून बुधाच्या मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मिथुन राशीत गुरुच्या प्रवेशाने काही राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतात. यासह मे महिन्याच्या शेवटी चंद्र देखील मिथुन राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेसरी राजयोग निर्माण होईल. या राजयोग काही राशीच्या लोकांना भरपूर फायदे मिळू शकतात. तब्बल १२ वर्षांनी मिथुन राशीत गजकेसरी राज योग तयार होत असल्याने काही राशींना नोकरी आणि व्यवसायासह अनेक गोष्टीत मोठे यश मिळू शकते. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशींबद्दल…

वैदिक कॅलेंडरनुसार, गुरु१४ मे रोजी वृषभ राशी सोडून मिथुन राशीत प्रवेश करेल. तर चंद्र देखील २८ मे रोजी दुपारी १ वाजून ३६ मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करेल. यावेळी गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेसरी राजयोग तयार होईल. हा राजयोग ३० मे पर्यंत म्हणजेच सुमारे ५४ तास राहील.

गजकेसरी राजयोग कसा तयार होतो?

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा चंद्र आणि गुरु कोणत्याही एका राशीत असतात तेव्हा हा राजयोग तयार होतो. याशिवाय, जर गुरु आणि चंद्र एकमेकांपासून मध्यभागी म्हणजेच चौथ्या, सातव्या किंवा दहाव्या घरात असतील तर हा राजयोग तयार होतो.

मिथुन (Gemini Zodiac Sign)

मिथुन राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग भाग्यवान ठरू शकतो. या राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात चांगले परिणाम दिसणार आहेत. तुमचा कल अध्यात्माकडे कल वाढू शकतो, ज्यामुळे तुम्ही धार्मिक बाबींमध्ये सक्रियपणे सहभागी होऊ शकाल. आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकते. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या आर्थिक संकटातून तुमची सुटका होईल. तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येतील.

कन्या (Virgo Zodiac Sign)

कन्या राशीच्या लोकांसाठीही गजकेसरी राजयोग फलदायी ठरू शकतो. या राशीच्या लोकांच्या सुखसोयीत झपाट्याने वाढ होऊ शकते. यासह शिक्षण क्षेत्रातही खूप फायदे मिळू शकतात. परदेश प्रवासाच्या अनेक शक्यता आहेत. परदेशात काम करण्यास इच्छुक असलेल्या लोकांना अनेक फायदे मिळू शकतात. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळू शकते. वैवाहिक जीवनही चांगले राहील. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुमच्या आयुष्यातही आनंदाचे क्षण येतील. घर किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील.

धनु (Sagittarius Zodiac Sign)

धनु राशीच्या लोकांसाठी गुरु आणि चंद्राची युती प्रभावी ठरू शकते. या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. यासह तुम्ही तुमच्या कुटुंबासह आनंदाने आणि शांतीने राहाल. कुटुंबातील सदस्यांमध्ये सुरू असलेला दुरावा आता संपुष्टात येऊ शकतो. वडिलांना आनंद मिळेल. तुम्हाला त्यांच्याकडून काही फायदा होऊ शकतो. सासरच्या लोकांकडूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही काही शुभ कार्यात सहभागी होऊ शकता. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. उत्पन्नाचे अनेक स्रोत खुले होतील.