Gajkesari Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात गजकेसरी राजयोग सर्वात शुभ मानला जातो. या राजयोगात जन्मलेली व्यक्ती भविष्यात राजासारखे जीवन जगते असे मानले जाते. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्येवर पूर्ण मेहनत घेत मात करते आणि शेवटी यश मिळवत आनंदी, समृद्धदायी जीवन जगते. यात हा राजयोग धनाचा कारक ग्रह गुरु आणि मनाचा कारक ग्रह चंद्र यांच्या संयोगातून तयार होत आहे. यात चंद्र हा सर्वात वेगवान ग्रह मानला जातो. चंद्राचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होऊन शुभ, अशुभ योग तयार होत असतात.

यात २९ एप्रिल रोजी चंद्र गुरु ग्रहाशी युती करून गजकेmरी राजयोग निर्माण करणार आहे. या राजयोगाने १२ राशींच्या जीवनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होतील, पण अशा ३ राशी आहेत ज्यांचे नशीब उजळू शकते. चला जाणून घेऊया या राशींबद्दल… चंद्र २९ एप्रिल रोजी पहाटे २ वाजून ५३ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करेल आणि १ मे पर्यंत या राशीत राहील.

वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग भाग्यशाली ठरू शकतो. या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या आर्थिक संकटातून सुटका होऊ शकते. कुटुंबासह तुमचा वेळ चांगला जाईल. आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण येऊ शकतात. मुलांकडून येणाऱ्या अडचणी आता संपुष्टात येऊ शकता. लव्ह लाईफ चांगली असेल. आर्थिक गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकेल.

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी खूप फायदे मिळू शकतात. तुम्ही करत असलेल्या कामातून तुम्हाला यश मिळू शकते. तुमच्या कामाचे कौतुक होईल. यामुळे वरिष्ठ अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी आनंदी असतील, ज्यामुळे तुम्हाला बोनस, पगारवाढ तसेच पदोन्नतीची शक्यता मिळू शकते. तुमच्या नेतृत्व क्षमतेत वाढ होऊ शकते. अशा परिस्थितीत तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. पैसे गुंतवून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. तुम्हाला आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण अनुभवता येतील.

कन्या (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठीही गजकेसरी राजयोग फलदायी ठरू शकतो. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तुमचा कल अध्यात्माकडे अधिक असेल, ज्यामुळे तुम्ही अनेक क्षेत्रात यश मिळवू शकाल. करिअरमध्ये तुम्हाला सकारात्मक बदल अनुभवता येतील. यासह , तुम्हाला प्रगती साधण्यासाठी अनेक संधी उपलब्ध होतील. कुटुंबासह कोणत्याही तीर्थस्थळी किंवा परदेशात प्रवासाचा योग जुळून येईल. तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळू शकेल. प्रगतीचे अनेक मार्ग खुले होऊ शकतात. तुम्ही नकारात्मक विचारांपासून दूर राहाल, ज्यामुळे तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. व्यवसाय क्षेत्रातही नफा मिळवण्याच्या अनेक संधी आहेत. लव्ह लाइफ देखील चांगली राहणार आहे. तुमचा जोडीदार आणि कुटुंबासह चांगला वेळ जाईल.