Gajkesari Rajyog Before Holi : ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राला मनाचा कारक मानले जाते. चंद्र ग्रह जेव्हा कोणत्याही राशीमध्ये परिवर्तन करतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र ५ मार्च रोजी म्हणजेच होळीच्या पूर्वी वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे जिथे पूर्वीच गुरू विराजमान आहे. वृषभ राशीमध्ये गुरू आणि चंद्राची युती झाल्याने गजरकेसरी राजयोग निर्माण करून अद्भूत संयोग निर्माण होणार. ज्योतिषशास्त्रामध्ये गजरकेसरी राजयोग अत्यंत शुभ प्रभाव देणारा ठरू शकतो. या शुभ राजयोगाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो. (Gajkesari Rajyog Before Holi three zodiac get money promotion in job and profit in business)
होळीपूर्वी निर्माण होणाऱ्या या गजकेसरी योगामुळे काही राशींना धनलाभ मिळू शकतो. या राशीचे भाग्य उजळू शकते आणि त्यांना भरपूर फायदा होऊ शकतो. त्या राशी कोणत्या, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
मेष राशी
गजकेसरी योग मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारू शकतात. व्यवसायामध्ये या लोकांना जबरदस्त आर्थिक लाभ मिळू शकतो. या दरम्यान नोकरीशी संबंधित लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते. हा काळ या राशीसाठी उत्तम आणि शुभ राहीन. मेष राशीच्या लोकांचे अडकलेले कामे पूर्ण होतील.
कर्क राशी
गजकेसरी योगमुळे कर्क राशीच्या लोकांचे नशीब चमकू शकते. याबरोबर नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते. पगारात वाढ होऊ शकते. या लोकांना जीवनात भरपूर आनंद मिळेन. अडकलेले धन परत मिळू शकतात. कर्क राशीच्या लोकांसाठी हा दिवस अतिशय उत्तम आहे. या राशींना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल.
कन्या राशी
गजकेसरी योग कन्या राशीच्या लोकांसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना या दरम्यान मेहनतीचे पूर्ण फळ मिळेन. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेन. या लोकांची करिअरमध्ये भरपूर प्रगती होईल. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ राहणार आहे. या लोकांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)