Gajkesari Rajyog July 2023: ज्योतिषशास्त्रानुसार गजकेसरीचा अर्थ पाहिल्यास हत्तीवर स्वार सिंह असा होतो. सिंह हा लक्ष्मीच्या अनेक वाहनांपैकी एक मानला जातो तर गजराज हे प्रत्यक्ष बुद्धिदाता गणराजाचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे बुद्धी व धनाची साथ एकत्रित लाभून एखाद्या राशीच्या व्यक्तीचा उत्कर्ष होऊ शकतो. जेव्हा राशीत गुरु व चंद्राची युती होते तेव्हा त्यातून लक्ष्मी व गणपतीचा प्रभावी गजकेसरी राजयोग तयार होतो. यासाठी गुरु ग्रह त्या राशीच्या चौथ्या तर चंद्र सातव्या किंवा दहाव्या स्थानी स्थित होणे आवश्यक असते. येत्या १० जुलैला म्हणजेच ५ दिवसांनी गजकेसरी राजयोग तयार होत आहे. हा राजयोग नेमक्या कोणत्या राशींवर प्रभावी असणार आहे व या मंडळींना कशाप्रकारे फायदा होऊ शकतो हे पाहूया…
गजकेसरी राजयोग बनल्याने ‘या’ राशींची स्वप्नपूर्ती?
मेष रास (Aries Zodiac Horoscope)
मेष राशीत गुरुदेवांनी यंदाचे सर्वात मोठे गोचर करून प्रवेश घेतला आहे. मेष राशीत चंद्र चौथ्या स्थानी आहे तर गुरु नवव्या व बाराव्या स्थानी स्थिर आहेत. या दोघांची युती मेष राशीत पहिल्या स्थानी प्रभावी असल्याने कामाच्या ठिकाणी प्रचंड लाभ होऊ शकतो. येत्या पाच दिवसात आपल्याला प्रचंड धनलाभाचे संकेत आहेत. लक्ष्मी तुम्हाला जोडीदाराच्या माध्यमातून धनलाभ मिळवून देऊ शकते. तुम्हाला गुंतवणुकीचे अधिकाधिक परतावे मिळू शकतात. नोकरीच्या स्वरूपात बदल होण्याची चिन्हे आहेत तुम्ही स्वतःचा एखादा नवा व्यवसाय सुरु करू शकता. नवीन कामाची सुरुवात लाभाची संधी ठरू शकते.
कर्क रास (Cancer Zodiac Horoscope)
कर्क राशीत चंद्र पहिल्याच स्थानी तर गुरुदेव हे सहाव्या व नवव्या स्थानी स्थिर आहेत. कर्क राशीच्या दहाव्या स्थानी गुरु- चंद्राची युती होत असल्याने वित्तीय लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला आईच्या रूपात धनाची प्राप्ती होऊ शकते. या काळात तुम्हाला संतानसुख मिळू शकते. तुमच्या अपत्यांच्या बाबत सुद्धा काही चांगली बातमी मिळू शकते. अचानक आर्थिक लाभही होऊ शकतो. दुसरीकडे, जे विचारवंत, कथाकार, मीडिया व समाज कार्याशी संबंधित आहेत, त्यांना या काळात चांगले लाभ मिळू शकतात.
धनु रास (Sagittarius Zodiac Horoscope)
धनु राशीच्या कुंडलीत चंद्र आठव्या स्थानी तर गुरु ग्रह पहिल्या व चौथ्या स्थानी असणार आहेत तर. गुरु व चंद्राची युती पाचव्या स्थानी तयार होत आहेत. गुरुची नवम दृष्टी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण तुमच्या गोचर कुंडलीत गुरूचे स्थान सातवे आहे. त्यामुळे यावेळी तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहू शकते. तसेच, या काळात तुम्हाला भागीदारीच्या कामात लाभ मिळू शकतो किंवा तुम्ही भागीदारीचे काम सुरू करू शकता. जे अविवाहित आहेत त्यांना लग्न प्रस्ताव येऊ शकतात. तसेच या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)