Gajkesri Rajyog : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट अंतराने राशी परिवर्तन करुन शुभ आणि अशुभ योग तयार करतात. ज्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. अशातच आता गुरु मेष राशीत भ्रमण करत असून २८ ऑक्टोबर रोजी चंद्र त्याच राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे या दोन ग्रहांच्या युतीमुळे गजकेसरी राजयोगाची निर्मिती होणार आहे. ज्योतिषशास्त्रात हा राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. या राजयोगाच्या निर्मितीमुळे ३ राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
मेष रास (Aries Zodiac)
गजकेसरी राजयोग मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण तुमच्या राशीच्या लग्न स्थानी हा योग तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुमची कामात आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. तसेच तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी राहू शकते. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. भागीदारीच्या कामात लाभ झाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो.
मिथुन रास (Mithun Zodiac)
गजकेसरी राजयोग तयार झाल्याने तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. कारण हा योग तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या ठिकाणी तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. तर नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळू शकते. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे.
कर्क रास (Cancer Zodiac)
गजकेसरी राजयोगाची निर्मिती कर्क राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. कारण हा योग तुमच्या राशीतून दहाव्या स्थानी तयार होणार आहे. त्यामुळे या काळात नोकरी आणि व्यवसायात तुमची चांगली प्रगती होऊ शकते. तुम्हाला व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला नोकरीशी संबंधित काही नवीन प्रस्ताव मिळू शकतात. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. मान-सन्मानात वाढ होऊ शकते, त्यामुळे या काळात तुमचे मन प्रसन्न राहू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)