Akshaya Tritiya 2024: साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच, अक्षय्य तृतीया. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. येत्या शुक्रवारी, १० मे रोजी अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे. यंदा अक्षय्य तृतीयाचा दिवस द्विगुणीत शुभ लाभ देणारा ठरु शकतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय्य तृतीयाचा शुभ मुहूर्तावर ‘गजकेसरी राजयोग’ निर्माण होणार आहे. हा राजयोग १०० वर्षांनी घडून येणार आहे. त्यामुळे काही राशींना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया यंदाच्या अक्षय्य तृतीयेपासून कोणत्या राशींचे भाग्य उजळू शकते.
‘या’ राशींना मिळणार नशिबाची साथ?
मेष राशी
अक्षय्य तृतीयेला गजकेसरी राजयोग बनल्याने मेष राशीच्या लोकांना सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात. तुमची रखडलेली कामं मार्गी लागू शकतात. जीवनात सुखसोयी मिळू शकतात. तुमच्या व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे मिळणार असल्याने आर्थिक स्थिती बदलण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक स्थिती दिवसेंदिवस मजबूत होण्याची शक्यता आहे.
(हे ही वाचा : ४ मे पासून ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? वरुथिनी एकादशीला ३ ‘शुभ राजयोग’ घडून आल्याने नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी)
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांना अक्षय्य तृतीयेला गजकेसरी राजयोग बनल्याने शुभ परिणाम मिळू शकतात. उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात. यावेळी तुम्हाला करिअर आणि व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमची संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात.
सिंह राशी
गजकेसरी राजयोग बनल्याने सिंह राशीच्या लोकांना भरपूर फायदा मिळू शकतो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. जर तुमचे काम किंवा व्यवसाय परदेशी देशाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. अडकलेले पैसेही मिळू शकतात. मालमत्ता खरेदी किंवा विक्री करू शकता.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)