Gajkesri Rajyog 2024: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह एका विशिष्ट कालावधीत राशी परिवर्तन करतात आणि शुभ आणि अशुभ योग तयार करतात. ज्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो. देवतांचा गुरु गुरू ग्रह सध्या मेष राशीत प्रवेश करत असून १८ ऑक्टोबर रोजी चंद्राने मेष राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे या दोन ग्रहांच्या संयोगाने गजकेसरी राजयोग निर्माण होईल. वैदिक ज्योतिष शास्त्रात हा राजयोग अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. अशा स्थितीत या राजयोगाच्या प्रभावामुळे ३ राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकते. तसेच या लोकांना धन-संपत्ती मिळू शकते. जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धनु राशी
गजकेसरी राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण हा राजयोग तुमच्या राशीतून पाचव्या घरात तयार होणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. म्हणजे मुलाना नोकरी लागू शकते किंवा लग्न होऊ शकते. या राशीच्या लोकांची लव्ह लाईफ रोमँटिक राहिल, तसेच तुमचे मन कमाई आणि कामाच्या ठिकाणी होत असलेल्या प्रगतीने प्रसन्न राहील. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे देखील मिळू शकतात. यावेळी तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल.

हेही वाचा – Makar Sankranti 2024 : यंदा केव्हा आहे मकर संक्रांती, १४ की १५ जानेवारी? जाणून घ्या तारीख आणि वेळ

मीन राशी
गजकेसरी राजयोग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण तुमच्या गोचर कुंडलीतील धन आणि वाणी घरावर हा राजयोग तयार होणार आहे. म्हणून, यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळतील. तसेच तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते तुम्हाला मिळू शकतात. व्यापारी वर्गातील लोकांना व्यवसायात भरपूर नफा आणि प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढेल. तसेच यावेळी तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील. पण शनीची साडेसाती चालू आहे, त्यामुळे यावेळी तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्या. तसेच आरोग्याची काळजी घ्यावी.

हेही वाचा – तब्बल १२ वर्षांनंतर सुर्य आणि गुरु निर्माण करणार ‘शक्तिशाली नवपंचम राजयोग’! ‘या’ राशींच्या लोकांचे उजळेल नशीब

मिथुन राशी
गजकेसरी राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. कारण तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या ठिकाणी हा राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होईल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तसेच तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. मुलांकडून तुम्हाला लाभ आणि आनंद मिळू शकेल. वडील आणि वडिलोपार्जित मालमत्तेतूनही तुम्हाला सुख मिळेल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gajkesari rajyog will make in mesh these zodiac signs could be lucky astrology snk