Gajkesari Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरू ग्रहाला समृद्धी आणि मान सन्मानाचा कारक मानले जाते. तसेच चंद्राला मनाचा कारक मानले जाते. गुरू ग्रह आता वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहे. तसेच चंद्र ५ मार्च रोजी वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहे ज्यामुळे गजकेसरी राजयोग निर्माण होईल. या राजयोगमुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. तसेच या राशींच्या पगारात वाढ होऊ शकते. करीअरमध्ये प्रगती होऊ शकते. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

वृषभ राशि (Taurus Zodiac)

गजकेसरी राजयोग हा वृषभ राशीच्या लोकांसाठी अतिशय फायद्याचे ठरू शकते. कारण हा राजयोग या राशीच्या गोचर कुंडलीमध्ये लग्न स्थानावर आहे. त्यामुळे या वेळी या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. या लोकांची बौद्धिक क्षमता वाढू शकते. तसेच कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. विवाहित लोकांचे वैवाहिक आयुष्य उत्तम राहीन. अविवाहित लोकांना लग्नाचे योग जुळून येईल. व्यवसायात नफा मिळू शकतो. धनलाभाचे योग जुळून येईल.

सिंह राशी (Leo Zodiac)

गजकेसरी राजयोग या सिंह राशीच्या लोकांसाठी अतिशय फायद्याचे ठरू शकते. हा राजयोग या राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायात निर्माण होत आहे. त्यामुळे या लोकांना कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात लाभ मिळू शकतो. तसेच करिअरच्या संबंधित टेन्शन दूर होणार आणि मानसिक स्थितीमध्ये सुधारणा दिसून येईल. अडकलेले पैसे परत मिळतील. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो.

कन्या राशी (Kanya Zodiac)

कन्या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग सकारात्मक ठरू शकतो. कारण हा राजयोग या राशीच्या लोकांच्या भाग्य स्थानावर विराजमान राहणार आहे. त्यामुळे या वेळी या लोकांना नशीबाची साथ मिळेल. अडकलेले कार्य आहे ते मार्गी लागतील. हा गोचर विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरू शकतो. तसेच जर सरकारी नोकरी संदर्भात हे लोक परीक्षा देत असतील तर त्यांना यश मिळू शकते. या लोकांना त्या वेळी लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच या दरम्यान हे लोक देश विदेशात प्रवास करू शकतात. धार्मिक आणि मांगलिक कार्यात सहभागी होऊ शकतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader