Gajkesari Yog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू या वेळी वृषभ राशीमध्ये विराजमान आहे आणि मे महिन्यापर्यंत या राशीमध्ये राहणार आहे. चंद्रमाबरोबर गुरूची युती खूप खास मानली जाते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ५ मार्च रोजी सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी चंद्र वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. वृषभ राशीमध्ये आधीच गुरू विराजमान आहे. अशात गुरू आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेसरी राजयोग निर्माण होऊ शकतो ज्यामुळे होळीपूर्वी या तीन राशींना अपार लाभ मिळू शकतो. जाणून घेऊ या, त्या राशी कोणत्या आहेत.
मीन राशी (Meen Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग लाभदायक ठरू शकते. या राशीमध्ये गुरू आणि चंद्राची युती तिसऱ्या भावात निर्माण होत आहे. अशात या राशीच्या लोकांना प्रसिद्धीबरोबर खूप मान सन्मान मिळू शकतो. जीवनात जगण्याचा एक मार्ग मिळू शकतो. दीर्घकाळापासून समस्येचा सामना करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते. करिअर क्षेत्रात खूप लाभ मिळू शकतो. व्यवसायात या लोकांच्या आयडिया यशस्वी ठरू शकतात. कुटुंब आणि मित्रांचे संपूर्ण सहकार्य प्राप्त होऊ शकते ज्यामुळे भरपूर यश मिळेन.
कुंभ राशी (Kumbha Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा गजकेसरी राजयोग लाभदायक ठरू शकता. या राशीमध्ये चौथ्या भावात गुरू आणि चंद्राची युती निर्माण होऊ शकते. अशात या राशीचे लोक लक्झरी लाइफ जगणार आणि सुख सुविधांमध्ये वृद्धी होणार. या लोकांचे संपूर्ण ध्यान त्यांच्या करिअरवर केंद्रित होईल ज्यामुळे या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो. या लोकांच्या कामाचे कौतुक केले जाईल. तसेच यांना प्रगतीची संधी मिळू शकते. घराचे रिनोव्हेशन, प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी करू शकता. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवायला मिळू शकते. जीवनात सुख शांती मिळू शकते.
वृश्चिक राशी (Vrashchik Zodiac)
या राशीमध्ये गुरू आणि चंद्राची युती सातव्या भावात राहणार आहे. अशात या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शते. करिअरमध्ये गजकेसरी राजयोग या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या लोकांना त्यांच्या प्रयत्नांचे फळ मिळू शकते. व्यवसाय क्षेत्रात या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो. पार्टनरशिपमध्ये असणाऱ्या लोकांना व्यवसात चांगला नफा मिळेल. प्रभावशाली लोकांबरोबर या लोकांचे चांगले संबंध निर्माण होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो. जीवनात सुख शांती लाभू शकते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)