Gajkesari Yog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. चंद्र एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. अशा स्थितीत चंद्र कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी जोडला जातो. ज्यामुळे शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतात. सध्या गुरू वृषभ राशीत विराजमानअसून २९ एप्रिल २०२५ रोजी चंद्रदेखील उच्च राशी असलेल्या वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे, त्यामुळे गजकेसरी राजयोग निर्माण होईल. या राजयोगाच्या प्रभावाने १२ राशींच्या व्यक्तींवर त्याचा शुभ परिणाम पाहायला मिळेल. या योगाच्या प्रभावाने या राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामात यश, आनंद आणि सुख, समृद्धीच् सुख मिळवता येईल.
पंचांगानुसार, चंद्र २९ एप्रिल रोजी सकाळी २ वाजून ५३ मिनिटांनी वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार असून तो १ मेपर्यंत याच राशीमध्ये असेल. ज्याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींवर होईल.
‘या’ तीन राशी होणार मालामाल
कर्क (Cancer)
कर्क राशीच्या व्यक्तींना गजकेसरी राजयोग अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.
तूळ (Turas)
हा राजयोग तूळ राशीसाठी खूप लाभदायी ठरेल. या काळात तुम्हाला अनेक गोष्टी प्राप्त करण्यास मदत मिळेल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल, भौतिक सुख-सुविधा प्राप्त कराल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात काही अडचणी येतील; पण तुम्ही त्या दूर करण्यास सक्षम असाल.
कुंभ (Aquarius)
गजकेसरी राजयोग कन्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. या काळात समाजात मान-सन्मान वाढेल. तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)