Gajlaxmi Rajyog 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एका विशिष्ट कालावधीत ग्रह राशी परिवर्तन करीत असतात. ग्रह वेळोवेळी राजयोग तयार करतात. अशात १२ वर्षांनंतर देवांचा गुरू मानला जाणारा गुरू ग्रह वृषभ राशीत, तर धन, वैभव देणारा शुक्र ग्रहदेखील वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या दोन ग्रहांचा संयोगामुळे गजलक्ष्मी राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल. पण, असे तीन राशीधारक आहेत की, ज्यांचे नशीब अचानक फळफळू शकते. इतकेच नाही, तर त्यांची संपत्तीदेखील वाढू शकते. तसेच करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. चला, जाणून घेऊ कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ

गजलक्ष्मी राजयोग वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. त्याशिवाय तुमच्या सुखसोईंमध्येही वाढ होईल आणि तुमची सर्जनशीलताही चांगली राहील. कौटुंबिक जीवन पूर्वीपेक्षा चांगले होईल. कुटुंबात काही आनंदाचे क्षण येऊ शकतात. यावेळी विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदी असेल. या काळात तुमच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते. नोकरीत यश आणि अनेक शुभ संधी मिळू शकतात. तुमच्या बढतीचीही शक्यता आहे. भागीदारीच्या कामातही तुम्हाला फायदा होईल. त्यासह तुमची आर्थिक स्थिती आणखी सुधारेल.

बक्कळ पैसा! सूर्य, बुध व शुक्र निर्माण करणार अद्भुत संयोग; १५ दिवसांपर्यंत ‘या’ राशींच्या व्यक्तींची होणार चांदी

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी गजलक्ष्मी राजयोग अनुकूल ठरू शकतो. या काळात जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली संधी मिळू शकते. यावेळी तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तसेच, तुम्हाला देश-विदेशांतही प्रवासाची संधी मिळू शकते. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठीही हा अधिक चांगला काळ असेल. या काळात विद्यार्थ्यांना पूर्वीपेक्षा शिक्षणात चांगली प्रगती साधता येऊ शकते. तसेच यावेळी तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकते.

कुंभ

गजलक्ष्मी राजयोग कुंभ राशीसाठी शुभ ठरू शकेल. या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळू शकेल. वाहन आणि मालमत्तेचे सुखही मिळू शकते. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळेल. त्याशिवाय तुमच्या प्रेमी जीवनात पूर्वीपेक्षा चांगले बदल घडून येऊ शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदाराला चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता, त्याला सहकार्य करू शकता. दुसरीकडे जर तुम्ही रिअल इस्टेट आणि मालमत्तेशी संबंधित कामे करीत असाल, तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल.

टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)