२९ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या काळात हरतालिका व्रत आणि गणेश चतुर्थी हे सण येत आहेत. त्यामुळेच काही राशींच्या लोकांसाठी येणारा आठवडा खूपच खास ठरणार आहे. या लोकांना नोकरी-व्यवसायात यश मिळण्यासोबतच मोठा आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. त्याचबरोबर काही लोकांचे वैवाहिक जीवन खूप चांगले राहील. त्यांच्यावर बाप्पाची विशेष कृपाही राहील. जाणून घ्या या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य

  • मेष

या आठवड्यात या राशीच्या लोकांच्या नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. नोकरीसंदर्भात थांबलेली कामे मार्गी लागतील. मित्रांची मदत मिळेल. तब्येत थोडी खराब राहू शकते. दरम्यान, या काळात राजकारण्यांना यश मिळेल. या आठवड्यात लाल आणि पिवळा हे रंग तुमच्यासाठी शुभ ठरतील. दररोज श्री विष्णु सहस्रनामाचा पाठ करा.

Shani will create Shash Raj
धनत्रयोदशीच्या शुभ मुहर्तावर तब्बल ३० वर्षानंतर शनी निर्माण करणार शश राजयोग; ‘या’ ३ राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य, मिळणार धनसंपत्तीचे सुख
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Weekly Lucky Horoscope 28 October to 3 November 2024
Weekly Lucky Horoscope: लक्ष्मी नारायण राजयोगाने सुरु होईल दिवाळीचा आठवडा! या राशींवर होईल लक्ष्मीची कृपा, अचानक आर्थिक लाभाची शक्यता
Diwali 2024 horoscope three zodiac signs
दिवाळी घेऊन येणार सुखाचे दिवस; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिन्यात मिळणार भरपूर पैसा, प्रेम अन् मानसन्मान
Grah Gochar 2024 : maa Lakshmi will give immense money
लक्ष्मीपूजनापूर्वी ५ मोठे ग्रह करणार गोचर, लक्ष्मी देणार ‘या’ पाच राशींना दिवाळी गिफ्ट, मिळणार अपार पैसा
Saturn transit 2024 in Aquarius
येणारे १५३ दिवस शनीच्या कृपेने दारी नांदणार लक्ष्मी; ‘या’ चार राशींचे व्यक्ती कमावणार बक्कळ पैसा
26 October Daily Horoscope IN Marathi
Daily Horoscope, 26 October : आज मेष ते मीनपैकी कोणाला मिळणार कष्टाचे फळ; व्यवसायात होईल नफा तर नवीन कामात मिळणार भरपूर यश
Dhantrayodashi 2024 Shubh Muhurat to buy Gold| Dhanteras 2024 Gold Buying Time
Dhantrayodashi 2024 Shubh Muhurat : धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी कोणत्या शुभ मुहूर्तावर खरेदी करावे? जाणून घ्या योग्य वेळ

Chanakya Niti: घरातील प्रमुखाने चुकूनही करू नयेत ‘या’ गोष्टी; अन्यथा कुटुंब विखुरण्यास वेळ लागणार नाही

  • वृषभ

या आठवड्यात वाहन खरेदीची शक्यता आहे. बुधवारनंतर धार्मिक प्रवासाचे नियोजनही करता येईल. हिरवा आणि पांढरा हे रंग तुमच्यासाठी शुभ आहेत. मॅनेजमेंट आणि आयटीची नोकरी करणाऱ्यांच्या करिअरमध्येही प्रगती होण्याची शक्यता आहे.

  • मिथुन

मंगळवारनंतर चंद्र कन्या आणि नंतर तूळ राशीत येईल. व्यवसायाशी संबंधित योजना पूर्ण स्वरूप घेतील. रखडलेल्या सरकारी कामात प्रगती झाल्याने आनंद मिळेल. हिरवा आणि निळा हे शुभ रंग आहेत. नोकरीतही बढती मिळण्याची चिन्हे आहेत.

Astrology: कुंडलीतील ‘हे’ संकेत सांगतात तुमच्यावर देवाची कृपा आहे की नाही! जाणून घ्या

  • कर्क

मंगळवार नंतर कन्या राशीचा चंद्र आणि मीन राशीचा गुरु अनुकूल राहील. या काळात विद्यार्थ्यांना यश मिळेल. व्यावसायिकांनाही व्यवसायात यश मिळेल. भगवान विष्णूची पूजा करत रहा. मन आध्यात्मिक विचारांनी भरून जाईल. या आठवड्यात लाल आणि पिवळा रंग तुमच्यासाठी शुभ ठरेल.

  • सिंह

हा आठवडा मीडिया, आयटी आणि शैक्षणिक क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांसाठी प्रगतीशील ठरू शकतो. चंद्राचे मीन राशीमधील संक्रमण राजकारण्यांना विशेष लाभ देऊ शकते. पिवळा आणि केशरी हे शुभ रंग आहेत. या आठवड्यात रखडलेले पैसे मिळू शकतात.

  • कन्या

या आठवड्यात सूर्य बाराव्या आणि शनि पाचव्या स्थानी राहील. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहील. दररोज आईवडिलांचा आशीर्वाद घ्या. व्यवसायात नवीन कार्य मिळेल किंवा अडकलेले पैसे मिळतील. मुलांची प्रगती होईल. लाल आणि केशरी रंग शुभ आहेत.

फारच Romantic असतात ‘या’ चार राशींचे लोक; ठरतात आयुष्याचा ‘परफेक्ट जोडीदार’

  • तूळ

या आठवड्यात तुम्हाला व्यवसायातील प्रगतीबद्दल आनंद मिळेल. मंगळवारनंतर शुक्र आणि मंगळाचे संक्रमण शिक्षण, बँकिंग आणि मीडिया क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना विशेष लाभ देईल. हनुमानाची पूजा करत राहा. वडिलांच्या आशीर्वादामुळे अनेक लाभ होतील. धनलाभ होऊ शकतो. पांढरा आणि निळा रंग शुभ ठरेल.

  • वृश्चिक

या आठवड्यात व्यवसायात यश मिळेल. राजकारणातील प्रगतीमुळे आनंदी राहाल. या काळात तुम्ही कुटुंबासोबत काही मोठे धार्मिक विधी करू शकता. केशरी आणि पिवळा हे शुभ रंग आहेत. धार्मिक यात्रा होऊ शकते.

  • धनु

सोमवारनंतर चंद्र दशमात म्हणजेच कर्मगृहात राहील यामुळे नोकरीत बढतीबाबत नवीन प्रस्ताव येऊ शकतो. अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे तुम्ही आनंदी असाल. बुधवार ते शुक्रवार उच्च अधिकार्‍यांकडून लाभ होण्याची संभावना आहे. लाल आणि हिरवा हे शुभ रंग आहेत.

  • मकर

पांढरा आणि निळा रंग शुभ आहेत. रोज हनुमानाची पूजा करत रहा. अनेक दिवसांपासून व्यवसायात अडकलेले उद्देश पूर्ण होईल. नोकरीशी संबंधित कामे पूर्ण होतील.

तब्बल १४ वर्षांनंतर ‘हा’ ग्रह बदलणार आपली रास; कुंभ, कन्यासह ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होईल वाढ

  • कुंभ

घरबांधणीशी संबंधित नवे काम सुरू होईल. भगवान विष्णूची नियमित पूजा करा. पांढरा आणि हिरवा रंग शुभ आहे. नोकरी आणि व्यवसायात फायदा होईल.

  • मीन

या आठवड्यात बरेच प्रवास टाळावे लागतील. राजकारण्यांना फायदा होईल. या काळात स्वास्थ्य चांगले राहील. पिवळा आणि पांढरा रंग शुभ आहे. विद्यार्थ्यांची प्रगती होईल.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)