Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat Date And Time : हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिन्यातील नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी या सणांनंतर आता गणेश चतुर्थीनिमित्त घरोघरी, मंडळांमध्ये लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमन झाले आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपती बाप्पा विराजमान झाले. आता पुढे दीड, तीन, पाच, सात, ११ ते अगदी २१ दिवस बाप्पा भक्तांसह वास्तव्य करणार आहेत. या काळात गणपती बाप्पाची रोज विधिवत पूजा केली जाईल. मोदक, लाडवाचा नैवेद्य दाखवला जाईल. एकूणच महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या भक्तिभावाने, हर्षोल्हासित मनाने गणेशोत्सव साजरा केला जातो. पण, २०२४ मध्ये गणेश चतुर्थीचे शुभ तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व काय आहेत? याविषयी आपण आजच जाणून घेऊया…

गणेश चतुर्थी २०२४ तारीख (Ganesh Chaturthi 2024 Date)

हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यंदा ही तिथी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०१ वाजता सुरू होत आहे आणि ७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५.३७ वाजता समाप्त होईल.

Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Astrological predictions 2025 for Uddhav Thackeray in Marathi
Uddhav Thackeray 2025 Astrological Predictions : ‘२०२५ पर्यंत सुवर्णकाळ…’ उद्धव ठाकरेंसाठी ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; म्हणाले, ‘शिवसेनेचे राज्य…’
nehru literature soon in one click available on digital form on mobile
नेहरूंचे साहित्य लवकरच एका क्लिकवर!
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी कोणाच्या डोक्यावर असेल श्रीहरी व महादेवाचे कृपाछत्र; वाचा तुमचे राशिभविष्य
jupiter retrograde 2024
५ दिवसांनंतर शनी-गुरू करणार कमाल; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी

अशा स्थितीत उदय तिथीच्या मान्यतेनुसार शनिवार म्हणजे ७ सप्टेंबरपासून गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. या दिवशी घरोघरी श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून विधिवत पूजा-अर्चा केली जाईल. या दिवसापासून पुढील २१ दिवसांपर्यंत गणेशोत्सव सुरू राहील.

गणेश चतुर्थी २०२४ शुभ मुहूर्त  (Ganesh Chaturthi Shubh Muhurat)

पंचागानुसार यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त दोन तास ३१ मिनिटे असणार आहे. गणेश चतुर्थी २०२३ रोजी सकाळी ११ वाजून ०३ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ३४ मिनिटांपर्यंत श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करीत पूजा करू शकता.

गणेश चतुर्थीला चार शुभ योग (Ganesh Chaturthi Shubh Yog)

गणेश चतुर्थीच्या दिवशी चार शुभ योग तयार होत आहेत. गणेश चतुर्थीला सकाळी ब्रह्म योग आहे; जो रात्री ११ वाजून १७ मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर इंद्र योग तयार होईल. या दोन योगांव्यतिरिक्त रवि योग सकाळी ०६ वाजून ०२ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत असणार आहे. तर सर्वार्थ सिद्धी योग दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत आहे; जो दुसऱ्या दिवशी ८ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजून ०३ मिनिटांपर्यंत आहे.

गणेश चतुर्थी कधी संपणार?

मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला गणेश चतुर्थीची सांगता होईल. १० दिवस प्राणप्रतिष्ठा झालेल्या गणेशमूर्तीचे या दिवशी विसर्जन केले जाईल आणि गणपती बाप्पाला निरोप देत पुढच्या वर्षी बाप्पाने लवकर यावे यासाठी प्रार्थना केली जाईल.

गणेश चतुर्थीचे महत्त्व (Why We Celebrate Ganesh Utsav ?)

गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाचा जन्म झाला. या दिवशी लोक उपवास करतात आणि गणपतीची पूजा करतात. श्री गणेशाच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात आणि दुःखे दूर होतात, असे मानले जाते.